एक्स्प्लोर
दोन हजारांपेक्षाही कमी किंमतीत रिलायन्स JioFi लाँच
नवी दिल्लीः रिलायन्स जिओ सिम खरेदी करणं ग्राहकांना चांगलंच कठीण झालं आहे. वाढती मागणी याचं प्रमुख कारण आहे. अशातच रिलायन्सने नवं उपकरण जिओफाय 4G लाँच केलं आहे. रिलायन्स स्टोअर्समध्ये या उपकरणाची किंमत केवळ 1 हजार 999 रुपये आहे.
जिओफायमध्ये 4G हॉटस्पॉट देण्यात आलं आहे. शानदार डिस्प्ले आणि 2600mAh क्षमतेच्या दमदार बॅटरीसह हे उपकरण देशभरातील रिलायन्स स्टोअर्समध्ये उपलब्ध करण्यात आलं आहे.
असा करा जिओफायचा वापर
घरात एकापेक्षा जास्त उपकरणं वापरली जात असतील त्यांच्यासाठी हे जिओफाय फायदेशीर आहे. जिओफायवर हॉटस्पॉटद्वारे एकाचवेळी 10 उपकरणं चालू शकतात. जिओफाय खरेदी केल्यानंतर त्याच्यासोबत जिओ सिम मिळणार आहे. या सिमचा वापर घरात हॉट्स्पॉटद्वारे केला जाऊ शकतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement