एक्स्प्लोर
‘आयफोन SE’च्या 16GB व्हेरिएंटची किंमत 39 हजार रुपये, तर 64GB व्हेरिएंट फक्त 48 हजार?

मुंबई : अॅपलचा बहुप्रीतिक्षित आयफोन एसई 21 मार्चला लॉन्च झाला. यावेळी केवळ 16 जीबी व्हेरिएंटची किंमत जाहीर करण्यात आली होती. 16 जीबी व्हेरिएंटची भारतातील किंमत 39 हजार रुपये आहे . मात्र, आता 64 जीबी व्हेरिएंटची भारतातील किंमत समोर आली आहे. ‘मॅकटेक डॉट कॉम’नुसार आयफोन SE ची भारतातील किंमत 48 हजार रुपये असणार आहे. मात्र, याबाबत औपचारिक माहिती घोषणा झालेली नाही. मात्र, 64 जीबी व्हेरिएंटची किंमत 50 हजार रुपयांच्या जवळपास असेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. iPhone 5S ची वैशिष्ट्ये-
- iPhone 5S ची बॉडी अॅनोडाईज्ड अॅल्युमिनीअमपासून बनवलेली आहे.
- iPhone 5S हा करडा (ग्रे), चंदेरी (सिल्व्हर) आणि सोनेरी (गोल्ड) अशा पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
- iPhone 5S चं बलस्थान म्हणाल या फोनमध्ये असलेला 64 बिट फोन प्रोसेसर हे आहे.
- iPhone 5S मधील कॅमेराही सर्वोत्कृष्ट आहे. मोबाईल फोटोग्राफरसाठी iPhone 5S हा एक सर्वोत्तम फोन आहे. याचा कॅमेरा 8 मेगापिक्सेलचा असला तरी त्यामध्ये पाच इलेमेन्ट लेन्स आहे. मोठा सेन्सर आणि अद्ययावत इमेज प्रोसेसिंग या कॅमेऱ्यांमध्ये आहे.
- iPhone 5S मध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे फिंगरप्रिंट सेन्सर…
- ‘आयफोन SE’बाबत अधिक माहिती:
- टच आयडी
- 12 मेगापिक्सेल कॅमेरा
- 4k व्हिडीओ क्षमता
- A9 प्रोसेसर
- M9मोशन प्रोसेसर
- वायफाय कॉलिंग
- आयफोन 5S पेक्षा तीन पटीने वेगवान
Before You Go
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा






















