एक्स्प्लोर
रेड मी नोट 4 च्या किंमतीत 1 हजार रुपयांची कपात
Mi.com आणि फ्लिपकार्टवर नव्या किंमतीसह हा फोन खरेदी करता येईल.

मुंबई : शाओमीचा रेड मी नोट 4 तुम्हाला खरेदी करायचा असेल तर आणखी एक संधी चालून आली आहे. या फोनवर खास ऑफर्स तर देण्यात आल्या आहेतच, शिवाय या फोनच्या किंमतीत एक हजार रुपयांची कपातही करण्यात आली आहे. Mi.com आणि फ्लिपकार्टवर नव्या किंमतीसह हा फोन खरेदी करता येईल.
फ्लिपकार्टवर 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट 11 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. शिवाय या फोनवर 11 हजार रुपयांपर्यंतची एक्स्चेंज ऑफरही आहे. म्हणजे तुम्हाला हा फोन केवळ 999 रुपयांमध्येही खरेदी करण्याची संधी आहे.
दुसरीकडे 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज व्हेरिएंट नव्या किंमतीसह 9 हजार 999 रुपयात उपलब्ध आहे. या फोनवर 9 हजार रुपयांपर्यंत एक्स्चेंज ऑफर आहे. या शिवाय बजाज फिनसर्व्ह क्रेडिट कार्ड वापरुन फोन खरेदी केल्यास आणखी ऑफर मिळणार आहेत.
केवळ 149 रुपयांमध्ये फ्लिपकार्ट या फोनवर बायबॅक गॅरंटी देत आहे. 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज व्हेरिएंटची बायबॅक गॅरंटी 6 ते 8 महिन्यांसाठी 5 हजार 500 रुपये, तर 9 ते 12 महिन्यांसाठी 3500 रुपये आहे. 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटची बायबॅक गॅरंटी 6 ते 8 महिन्यांसाठी 6500 रुपये आहे. तर 8 ते 12 महिन्यांसाठी 4500 रुपये मिळतील.
शाओमी रेड मी नोट 4 चे फीचर्स :
- 5.5 इंच आकाराची स्क्रीन
- स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर
- 2GB/3GB/4GB रॅम व्हेरिएंट
- 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
- 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- 4100mAh क्षमतेची बॅटरी
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
नाशिक
क्रिकेट
Advertisement
Advertisement


















