एक्स्प्लोर
Advertisement
वाईट सवयींना शॉक, आता तुमच्या वाईट सवयींवर लगाम ठेवणार 'पॅव्हलॉक' ब्रेसलेट
या ब्रेसलेटची किंमत जवळपास 13 हजार रुपये आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर हे ब्रेसलेट 150 वेळा शॉक देऊ शकतं. या शॉकमुळे कुठलाही धोका नाही असं कंपनीकडून सांगण्यात येत आहे. या ब्रेसलेटमुळे लागणारा शॉक जास्त तीव्रतेचा नसून केवळ तुम्हाला अलर्ट करेल इतकी त्याची तीव्रता असल्याचा कंपनीचा दावा आहे.
मुंबई : आपल्याला लागलेल्या वाईट सवयी सोडवण्यासाठी अनेक जण अनेक वेगवेगळे उपाय करत असतात. जंक फूड खाणं, जास्त वेळ झोपण किंवा सिगारेट ओढणं यासारख्या वाईट सवयींपासून पिच्छा सोडवण्याचा बरेच जण प्रयत्न करत असतात. मात्र आता या वाईट सवयींपासून तुम्हाला रोखण्यासाठी शॉक देणारे एक ब्रेसलेट बाजारात आले आहे. वाईट सवयींपैकी कुठलीही गोष्ट जेव्हा तुम्ही कराल तेव्हा हे ब्रेसलेट तुम्हाला शॉक देईल आणि तुम्ही करत असलेल्या चुकीची आठवण करुन देईल.
'पॅव्हलॉक ब्रेसलेट' असे याचे नाव असून अॅमेझॉन या ऑनलाइन शॉपिंग साईटवर हे ब्रेसलेट उपलब्ध आहे. हे डिव्हाईस मोबाईल अ्ॅपद्वारे कंट्रोल करण्यात येते. या अॅपमध्ये ब्रेसलेट वापरणाऱ्या व्यक्तीसाठी त्याला सोडायच्या असणाऱ्या सवयींबद्दल सेटिंग करता येते.
एखाद्या व्यक्तीला खाण्यावर नियंत्रण आणायचे असेल तर अॅपमध्ये तशी सेटिंग करावी लागते. त्यानंतर हे ब्रेसलेट वापरणारी व्यक्ती जर गरजेपेक्षा जास्त खात असेल तर त्यांना हे ब्रेसलेट शॉक देते. हे डिव्हाइस फक्त खाण्यावर नियंत्रण आणण्यासाठी नसून इतरही वाईट सवयी सोडवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.
खाण्यासोबतच धुम्रपानाची सवय, जास्त वेळ झोपण्याची सवय किंवी इंटरनेटवर जास्त वेळ घालवण्याची सवय याबाबतही हे ब्रेसलेट काम करते. यापैकी आपल्याला कोणत्या सवयींपासून सुटका हवी आहे ते युजरला मोबाईल अॅपमध्ये निवडावे लागते. हे डिव्हाइस वापरायला लागल्यानंतर युजर्समध्ये 3 ते 5 दिवसांत सवयींमध्ये बदल झाल्याचं दिसून आल्याचा दावा कंपनीने केला आहे.
या ब्रेसलेटची किंमत जवळपास 13 हजार रुपये आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर हे ब्रेसलेट 150 वेळा शॉक देऊ शकतं. या शॉकमुळे कुठलाही धोका नाही असं कंपनीकडून सांगण्यात येत आहे. या ब्रेसलेटमुळे लागणारा शॉक जास्त तीव्रतेचा नसून केवळ तुम्हाला अलर्ट करेल इतकी त्याची तीव्रता असल्याचा कंपनीचा दावा आहे.
या ब्रेसलेटमध्ये काही सेन्सर्सचा वापर करण्यात आला आहे ज्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या सवयी ट्रॅक करता येऊ शकतात. या सवयी ट्रॅक करण्यासाठी इंटरनल सेन्सर, मोशन सेन्सर आणि डिजिटल डेटाचा वापर करण्यात येतो. यामध्ये वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानामुळे हाताच्या 'गेस्चर'चा अंदाज येतो त्यामुळे सिगारेट ओढण्यासारख्या सवयी ओळखता येतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement