Vivo X70 Series चे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, काय आहेत ऑफर्स? वाचा सविस्तर
Vivo X70 Pro फोनच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी अंतर्गत स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 46,990 रुपये आहे, तर 8 जीबी रॅम आणि 256 जीबी अंतर्गत स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 49,990 रुपये आहे.
Vivo X70 Series : सध्याच्या फेस्टिव सीजनमध्ये अनेक स्मार्टफोन कंपन्या त्यांच्या निवडक स्मार्टफोनवर ऑफर देत आहेत. Vivo कंपनीच्या Vivo X70 सीरिजच्या स्मार्टफोनलाही कमी किमतीत खरेदी करण्याची संधी मिळत आहे. ही ऑफर 15 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. या ऑफर अंतर्गत, कंपनी पाच हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक व्यतिरिक्त नो-कॉस्ट ईएमआय आणि जिओ बेनिफिट्स मिळतील. तुम्ही या ऑफर्सचा लाभ Vivo India R-store आणि e-commerce प्लॅटफॉर्मद्वारे घेऊ शकता. यासाठी आयसीआयसीआय बँक, सिटीबँक आणि कोटक महिंद्रा बँकेच्या कार्डने पेमेंट करावे लागेल.
काय आहे किंमत?
Vivo X70 Pro फोनच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी अंतर्गत स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 46,990 रुपये आहे, तर 8 जीबी रॅम आणि 256 जीबी अंतर्गत स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 49,990 रुपये आहे. याशिवाय फोनच्या 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 52,990 रुपये आहे. 7 ऑक्टोबरपासून कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे फोनची विक्री केली जाईल. दुसरीकडे, Vivo X70 Pro + 12GB रॅम आणि 256GB अंतर्गत स्टोरेजसह फक्त एक व्हेरिएंटसह येतो. त्याची किंमत 79,990 रुपये आहे. त्याची विक्री 12 ऑक्टोबरपासून सुरू होईल.
Vivo X70 Pro चे स्पेसिफिकेशन्स
Vivo X70 Pro स्मार्टफोनमध्ये 6.56-इंचाचा अल्ट्रा HD AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1080x2376 पिक्सेल आणि 120Hz चा रिफ्रेश रेट आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित FunTouch OS 12 वर काम करतो. स्मार्टफोन MediaTek Dimensity 1200 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात 12GB रॅम आणि 512GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे.
कॅमेरा
फोटोग्राफीबद्दल बोलायचे तर, Vivo X70 Pro मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याचा प्राइमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे. तर दोन कॅमेरे 12 मेगापिक्सेलचे आहेत. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलचा पेरिस्कोप सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. त्याचा कॅमेरा अल्ट्रा सेन्सिंग गिम्बल तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.
बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी
Vivo X70 Pro स्मार्टफोनमध्ये पॉवरसाठी 4450mAh ची बॅटरी आहे, जी 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. कनेक्टिव्हिटीसाठी, त्यात वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी पोर्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी, यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
Vivo X70 Pro+ चे फीचर्स
Vivo X70 Pro + स्मार्टफोनमध्ये 6.78 इंचाचा अल्ट्रा HD AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1,440x3,200 पिक्सेल आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित FunTouch OS 12 वर काम करतो. स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 888+ प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात 12GB रॅम आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज आहे.
कॅमेरा
फोटोग्राफीबद्दल बोलायचे तर, Vivo X70 Pro+ मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याचा प्राइमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे. तर दोन कॅमेरे 12 मेगापिक्सेलचे आहेत. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलचा पेरिस्कोप सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. त्याचा कॅमेरा अल्ट्रा सेन्सिंग गिम्बल तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.
बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी
Vivo X70 Pro + स्मार्टफोनमध्ये पॉवरसाठी 4,450mAh ची बॅटरी आहे, जी 55W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. कनेक्टिव्हिटीसाठी, त्यात वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी पोर्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.