एक्स्प्लोर
15.95 MBPS वायफाय स्पीड, डोकोमो आशियात चौथ्या क्रमांकावर
नवी दिल्ली : दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टाटा डोकोमोच्या वायफायने अनोखी नोंद केली आहे. आशियातील टॉप-10 विमानतळांवरील वायफायच्या तुलनेत सर्वाधिक स्पीड असलेला चौथं वायफाय नेटवर्क म्हणून टाटा डोकोमोची नोंद झाली आहे.
‘ओकला’ या स्पीड टेस्ट एजन्सीने या नोंदीची घोषणा केली आहे. मार्च ते मे 2017 या तीन महिन्यांच्या कालावधीत स्पीड टेस्टचा डेटा जमवला आहे.
‘ओकला’च्या स्पीड टेस्ट रिपोर्टबाबात टाटा डोकोमोचे उपाध्यक्ष नटराज यांनी सांगितले, “आम्हाला अतिशय आनंद झालाय की, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आमची वायफाय सेवा वेगाच्या यादीत आशियात चौथ्या क्रमांकावर आहे. टाटा डोकोमोचं पब्लिक वायफाय म्हणजे डिजिटायजेशनच्या दिशेने टाकलेलं पाऊल आहे.”
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टाटा डोकोमोचं मोफत वायफाय सुमारे 15.95 एमबीपीएस स्पीड आहे. सिंगापूरमधील चांगी विमानतळ, बँकॉकमधील सुवर्णभूमी विमानतळ यांच्याही पुढे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. तर पहिल्या तीन स्थानांवर अनुक्रमे दुबई इंटरनॅशनल, सियोलमधील इंचियॉन इंटरनॅशनल आणि टोकियोमधील हनेडा विमानतळ आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement