एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोस्ट सक्सेसफुल फोन, तरीही ‘OnePlus 3T’ची भारतातील विक्री बंद?
नवी दिल्ली : वनप्लस कंपनी मोस्ट सक्सेसफुल स्मार्टफोन ‘OnePlus 3T’ची भारतातील विक्री बंद करण्याची शक्यता आहे. याआधी यासंदर्भात चर्चा सुरु झाल्या होत्या, त्यावेळी कंपनीने चर्चा फेटाळल्या होत्या. मात्र, आता कंपनीनेच ‘OnePlus 3T’ स्मार्टफोनची भारतातील विक्री बंद करण्याचे संकेत दिली आहेत.
वनप्लस 3T हा स्मार्टफोन वनप्लस कंपनीचा सर्वात यशस्वी स्मार्टफोन म्हणून गणला जात आहे.
वनप्लस कंपनीचे कर्मचारी स्टिव्हन जी स्टेट्स यांनी ही पोस्ट फोरमवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “OnePlus 3T चे हँडसेट आऊट ऑफ स्टॉक होण्याआधी हा स्मार्टफोन खरेदीसाठी ही शेवटची संधी आहे.”
दरम्यान, ‘फोनअरीना’च्या वृत्तानुसार, वनप्लसने सांगितले आहे की, एक जूनपासून वनप्लस 3T इंग्लंडसह युरोपमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार नाही.
‘OnePlus 3T’चे फीचर्स :
- 5.5 इंच डिस्प्ले (1920 x 1080 पिक्सेल रिझॉल्युशन)
- क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 821 प्रोसेसर
- 6 जीबी रॅम
- 16 मेगापिक्सेलचा फ्रंट आणि बॅक कॅमेरा
- 3400mAh क्षमतेची बॅटरी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement