OnePlus 10T : 16GB रॅम अन् 512GB मेमरी; दमदार फिचर्ससह येणार वनप्लसचा आगामी स्मार्टफोन
OnePlus 10T Specifications Leaked : OnePlus 10T मध्ये 16GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 512GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज मिळू शकते. OnePlus कडून सर्वाधिक रॅम असलेला हा पहिला स्मार्टफोन ठरु शकतो.
OnePlus 10T Specifications Leaked : गेमिंगचे शौकीन आहात आणि नवा फोन घेण्याचा विचार करताय? मग ही बातमी तुमच्यासाठीच. वनप्लस (Oneplus) लवकरच एक दमदार फोन बाजारात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वनप्लस कंपनी 10 सिरीजमधील (Oneplus 10T) नवा स्मार्ट फोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या फोनमध्ये कंपनी रॅम आणि स्टोरेजसह अनेक स्पेसिफिकेशन्सची युजर्सना पर्वणी देण्याची शक्यता आहे. असं सांगण्यात येत आहे की, वन प्लसच्या या स्मार्टफोनमध्ये 16 जीबीपर्यंत LPDDR5 रॅम आणि 512GB UFS 3.1 स्टोरेज मिळू शकतं. त्यासोबतच वनप्लस 10T मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8+ (Qualcom Snapdragon 8+) जनरेशन 1 चिपसेट दिला जाऊ शकतो. तसेच, फोनमध्ये 50 मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सरसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो.
टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशनने चिनी सोशल मीडिया साईट Weibo द्वारे OnePlus 10T चे स्पेसिफिकेशन्स लिक केले आहेत. टिपस्टरनं दिलेल्या माहितीनुसार, OnePlus 10T ला 16GB पर्यंत LPDDR5 रॅम आणि 512GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज दिलं जाईल. इतक्या क्षमतेचा रॅम देणारा वनप्लसचा हा पहिला फोन असेल. दरम्यान, आतापर्यंत वनप्लसनं आपल्या डिव्हाइसमध्ये सर्वाधिक 12 जीबी रॅम दिला आहे.
कसा असेल डिस्प्ले?
OnePlus 10T ला 6.7 इंच FHD + LTPO 2.0 AMOLED डिस्प्ले 120HZ रिफ्रेश रेट, 360HZ टच सॅम्पलिंग रेट, HDR10+ आणि कदाचित गोरिल्ला ग्लास लेयर देखील मिळू शकतो. तसेच, ते Android 12 वर आधारित ऑक्सिजन ओएस कस्टम स्किनला सपोर्ट करू शकते.
दमदार कॅमेरा
कॅमेऱ्याबाबत बोलायचं झालं तर OnePlus 10T मध्ये 50 मेगापिक्सेल सोनी IMX766 प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स आणि 2 मेगापिक्सेल मायक्रो सेन्सर दिला जाऊ शकतो. तसेच, या फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा सेल्फी स्नॅपर देखील असू शकतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :