एक्स्प्लोर
आता कुचंबणा नाही, मुंबई महापालिकेकडून ‘टॉयलेट लोकेटर’ अॅप लॉन्च
मुंबई : मुंबईसारख्या गर्दीच्या शहरात सार्वजनिक शौचालय शोधणं हे एक दिव्य काम असतं. त्यातही ‘महिलांना शौचालय कुठेय’ असा शौचालयाचा पत्ता विचारायचा असेल ते आणखीनच कठीण ठरतं. मात्र, आता मुंबईत सहजगत्या तुम्हाला जवळच्या सार्वजनिक शौचालयाचा पत्ता एका अॅपच्या मदतीने शोधता येणार आहे. यासाठी मुंबई महापालिकेने मुंबईकरांसाठी खास मुंबई टाँयलेट लोकेटर अॅप तयार केलं आहे.
मुंबईतील सार्वजनिक शौचालये शोधण्यासाठी मुंबई महापालिकेचे मुंबई टॉँयलेट लोकेटर अॅप असून, मोबाईलमधल्या अॅपच्या आधारे जवळचं सार्वजनिक शौचालय शोधता येणार आहे.
‘Mumbai Toilet Locator App’ हे 'अँड्रॉईड अॅप' तयार केले आहे. या अॅपचे अनौपचारिक उद्घाटन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या हस्ते आज करण्यात आले.
मुंबई टॉयलेट लोकेटर अॅपबद्दल माहिती :
- ‘Mumbai Toilet Locator App’ हे अँड्रॉईड अॅप गूगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
- गुगल प्ले स्टोअरवर‘Mumbai Toilet Locator App’ या नावाने सर्च करुन हे अॅप आपल्या अँड्रॉईड स्मार्ट फोनवर सहजपणे डाऊनलोड व इन्स्टॉल करता येणार आहे.
- मुंबई महापालिका क्षेत्रातील 800 सशुल्क सार्वजनिक शौचालये सध्या या अॅपला जोडण्यात आली आहेत. तसेच इतरही सार्वजनिक शौचालये या अॅपला जोडण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरु आहे.
- हे ऍप आपल्या स्मार्टफोनवर डाऊनलोड व इन्स्टॉल केल्यावर जीपीएस(Global Positioning System) च्या सहाय्याने आपण ज्या भागात असू, त्या भागातील जवळचे शौचालय, तिथे जाण्याचा मार्ग व आपण असलेल्या ठिकाणापासूनचे अंतर देखील या ऍप वर दर्शविले जाणार आहे.
- या अॅपशी जोडलेल्या प्रत्येक शौचालयाचे छायाचित्र देखील ऍपद्वारे दर्शविले जाणार आहे. ज्यामुळे शौचालय शोधणे अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement