एक्स्प्लोर
मोटोरोलाच्या ‘मोटो एक्स फोर्स’वर तब्बल 16 हजारांची सूट
मुंबई : मोटोरोलाने Moto X Force च्या किंमतीत मोठी कपात केली आहे. मोटोरोलाने फेब्रुवारीत हा स्मार्टफोन लॉन्च करताना म्हटलं होतं की, स्मार्टफोन पडल्यानंतरही स्क्रीनला काहीही होणार नाही. जगभरातील तंत्रज्ञानविषयक तज्ज्ञांकडून या स्मार्टफोनचं कौतुक झालं आहे.
फेब्रुवारीत लॉन्च झालेल्या Moto X Force या स्मार्टफोनची किंमत 49 हजार 999 रुपये होती. मात्र, आता मोटोरोलाने या स्मार्टफोनच्या किंमतीत 16 हजार रुपये एवढी मोठी कपात केली आहे. 16 हजार रुपयांच्या सवलतीसह Moto X Force स्मार्टफोन फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरून खरेदी करता येणार आहे.
Moto X Force च्या किंमतीत कपात केल्यानंतर आता 32 जीबी व्हेरिएंट 34 हजार 999 रुपयांना, तर 64 जीबी व्हेरिएंट 37 हजार 999 रुपयांना मिळणार आहे.
Moto X Force अधिकाधिक फीचर्स मोटोच्या याआधीच्या Moto X Style या स्मार्टफोनसारखेच आहेत. Moto X Force चं वैशिष्ट्य आणि आकर्षणाची गोष्ट म्हणजे प्रोसेसर. त्याचसोबत ब्रेक प्रूफ आणि पूर्णपणे वॉटर प्रूफ हेही या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य आहेत. टचस्क्रीनला दोन लेयर असल्याने स्क्रीन सुरक्षित राहण्यास मदत होते.
5.4 इंचाचा एचडी डिस्प्ले असून 3 जीबी रॅम, त्यासोबत ग्राफिक्ससाठी Adreno 430 GPU लावण्यात आलं आहे. फोटोग्राफीसाठी 21 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि सेल्फीप्रेमींसाठी 5 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 3760mAh क्षमतेची बॅटरी असून, 30 तासांपर्यंत बॅटरी बॅकअपचा दावा मोटोरोलाने केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement