एक्स्प्लोर

कागदपत्र सांभाळण्यापासून मुक्ती, गाडीचा नंबर टाका आणि सर्व माहिती मिळवा

वाहनाची कागदपत्र सांभाळणं, किंवा जुनं वाहन विकत घेताना ते योग्य आहे का याची खात्री करणं ही मोठी समस्या असते. परिवहन विभागाने या समस्येचं निराकरण केलं आहे.

मुंबई : तुम्ही जुनी गाडी विकत घेण्याच्या तयारीत असाल तर थोडं थांबा. जुनी गाडी विकत घेताना सर्वात मोठी चिंता असते ती म्हणजे गाडी चोरीची तर नसेल ना? किंवा या गाडीच्या नावावर एखादा गुन्हा तर नसेल ना? या सर्व समस्यांमधून ग्राहकांची आता मुक्तता होणार आहे. परिवहन विभागाने एक असं अॅप तयार केलं आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला गाडीचा नंबर सर्च करताच सर्व माहिती मिळेल. देशभरात परिवहन विभागाने एम परिवहन (m parivahan) नवाचं एक नवीन अॅप लाँच केलंय. यात देशभरातील वाहनांची संपूर्ण माहिती दिली जाणार आहे.  वाहनाचा मालकी हक्क कोणाचा आहे,  वाहनांवर परिवहन विभागाने काही कारवाई केली आहे का, वाहन डिझेलवर आहे, की पेट्रोलवर अशी संपूर्ण माहिती एका ठिकाणी मिळेल. काय आहे एम परिवहन अॅप? एम परिवहन हे अॅप परिवहन विभागाकडून लाँच करण्यात आलं आहे. या अॅपमध्ये तुम्ही दुचाकी, चार चाकी या वाहनांचा नंबर सर्च केल्यास त्या वाहनाबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. शिवाय वाहन परवाना नंबर सर्च करुन त्याबद्दल आणि त्या व्यक्तीबद्दल माहिती मिळवता येईल. नवीन वाहन चालकाला वाहन परवाना कशा पद्धतीने मिळवता येईल, याबाबतही या अॅपमध्ये माहिती मिळेल. एम परिवहनचा वापर कसा कराल? तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरुन एम परिवहन हे अॅप डाऊनलोड करावं लागेल. अॅप ओपन केल्यानंतर तुम्हाला दोन पर्याय दिसतील. (व्हर्च्युअल आरसी आणि व्हर्च्युअल डीएल) यानंतर एम परिवहन अॅपचं होम पेज ओपन होईल, सर्च पर्याय निवडून त्यात तुमचा वाहन नंबर सर्च करा. तुम्हाला तुमचा वाहनाबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. वाहन चालक परवाना, वाहनांचे कागदपत्र यावरुन पोलीस प्रशासन आणि वाहन चालक यांच्यात नेहमी वाद होत असतात. वाहनचालक  कागदपत्र घरी विसरल्यास त्यांना पोलिसांनी पकडल्यास दंड भरावा लागतो. त्यामुळे आता एम परिवहन अॅपद्वारे वाहनांचे कागदपत्र पोलिसांना डिजिटल पद्धतीने दाखवता येणार आहेत. डिजिटल वाहन परवाना मिळण्यासही सुरुवात होणार आहे. तेलंगणा राज्यात डिजिटल वाहन परवान्याची सुविधा अगोदरच सुरु झालेली आहे. त्यामुळे आता संपूर्ण देशभरात प्रभावीपणे याची अंमलबजावणी होण्याची आशा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget