एक्स्प्लोर

'या' दिवशी लॉन्च होणार Microsoft Windows चं बहुप्रतिक्षित 'नेक्स्ट जेनेरेशन'; युजर्सना फिचर्सची पर्वणी

Microsoft 24 जून रोजी होणाऱ्या इव्हेंटमध्ये Windows ऑपरेटिंग सिस्टमचं 'नेक्स्ट जेनेरेशन' वर्जन लवकरच लॉन्च करणार आहे. Microsoft चे सीईओ सत्या नडेलाही असणार उपस्थित

मुंबई : Microsoft याच महिन्यात आपल्या Windows ऑपरेटिंग सिस्टमचं 'नेक्स्ट जेनेरेशन' वर्जन लवकरच लॉन्च करणार आहे. कंपनीने घोषणा केली आहे की, कंपनी 24 जून रोजी संध्याकाळी 8.30 वाजता एका वर्च्युअल इव्हेंटचं आयोजन करणार आहे. या इव्हेंटमध्ये Microsoft चे सीईओ सत्या नडेला आणि चीफ प्रोडक्ट ऑफिसर पानोस पनयही उपस्थित राहणार आहे. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या Microsoft बिल्ड डेवलपर कॉन्फ्रेंस 2021 मध्ये कंपनीने यासंदर्भात माहिती दिली. लवकरच कंपनी आपल्या  Windows ऑपरेटिंग सिस्टमचा नेक्स्ट जनरेशन वर्जन लॉन्च करणार आहे. आता ते 24 जून रोजी होणाऱ्या इव्हेंटमध्ये हे नवं वर्जन युजर्ससाठी लॉन्च करणार आहे. 

Windows Central च्या रिपोर्टनुसार, Windows ऑपरेटिंग सिस्टमच्या या नव्या वर्जनचं कोड नेम 'Sun Valley' ठेवण्यात आलं आहे. यामध्ये Windows चं नवं अॅप स्टोअर आणि युजर इंटरफेसचं नवं डिझाइनचाही समावेश आहे. त्याचसोबत या नव्या वर्जनमध्ये काही खास अपडेट्सही पाहायला मिळेल. 

डेव्हलपर आणि क्रिएटरवर असणार फोकस 

बिल्ड डेवलपर कॉन्फ्रेंस 2021 दरम्यान, Microsoft चे सीईओ सत्य नडेलाने म्हटलं होतं की, "आम्ही  Windows ऑपरेटिंग सिस्टममध्ये काही मोठे अपडेट करणार आहोत. हे गेल्या एका दशकापासून आतापर्यंतचे सर्वात महत्त्वाचे बदल असणार आहेत. हे नवे अपडेट्स आम्ही लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. आमचा हेतू याद्वारे डेव्हलेपर आणि क्रिएटर अधिक चांगल्या आर्थिक संधी देणं हा आहे. गेल्या काही महिन्यांपासून मी स्वतः यावर काम करत आहे. मी Windows च्या या नेक्स्ट जेनरेशनबाबत खूपच उत्साही आहे."

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून मायक्रोसॉफ्ट Windows च्या नव्या अॅपवर काम करत आहे. त्याचसोबत ऑपरेटिंग सिस्टमच्या युजर इंटरफेसमध्ये अनेक महत्त्वाच्या बदलांवर काम केलं आहे. या अॅप स्टोअरमध्ये डेव्हलपर्सही आपले अॅप तयार करुन टाकू शकणार आहेत. ज्यामध्ये क्रोम आणि फायरफॉक्सप्रमाणे ब्राउझर्सचाही समावेश असणार आहे. या व्यतिरिक्त युजर्सना ऑपरेटिंग सिस्टिममध्ये विंडो 95 चे आयकॉन मिळू शकतात. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime : नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime : नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
Harshvardhan Patil: दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य
Pune BJP Action: पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
Embed widget