एक्स्प्लोर

धनत्रयोदशीला 500हून अधिक MG Astor ग्राहकांकडे सुपूर्द, कंपनीनं रचला विक्रम

MG Astor SUV : एमजी मोटर्स (MG Motors) नं पहिल्या बॅचमधील एमजी अॅस्टर (MG Astor) च्या 500हून अधिक कार्स धनत्रयोदशीला ग्राहकांकडे सुपूर्द केल्या आहेत.

MG Astor SUV : एमजी मोटर (MG Astor)नं धनत्रयोदशी (Dhanteras 2021) च्या दिवशी आपली नवीकोरी कार एमजी एस्टर (MG Astor) ची पहिली बॅच ग्राहकांना दिली. पहिल्याच दिवशी कंपनीनं 500 हून जास्त युनिट्स आपल्या पहिल्या बॅचच्या ग्राहकांना डिलिव्हर केले आहेत. ऑटोमोबाइल इंडस्ट्रीमध्ये सध्या सेमीकंडक्टरचा तुटवडा जाणवत आहे. अशातच पहिल्याच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर गाड्यांची डिलिव्हरी करत कंपनीनं एक नवा विक्रम रचला आहे. 

आता कंपनी आणखी एक विक्रम रचण्यासाठी तयारी करत आहे. एमजी मोटर डिसेंबर 2021 च्या शेवटापर्यंत 4,000-5,000 यूनिटची डिलीव्हरी करण्याचं आपलं टार्गेट पूर्ण करण्यासाठी तयारी करत आहे. काही दिवसांपूर्वीच लॉन्च झालेल्या एमजी एस्टर बुकिंगच्या सुरुवातीच्या 20 मिनिटांतच 2021 मध्ये तयार झालेल्या सर्व गाड्यांची विक्री झाली होती. कंपनी (MG Motor India) नं आता 2022 साठी बुकिंग सुरु केली आहे. ग्राहक एमजी मोटरच्या डिलर्सकडून किंवा कंपनीच्या ऑफिशिअल वेबसाइटवरुन ऑनलाइन बुकिंग करु शकतात. एमजी एस्टर ही एसयुव्ही कार नऊ व्हेरिएंट्स आणि पाच कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आली आहे. या कारची शोरुम किंमत 9.78 लाख रुपये आहे. 

धनत्रयोदशीला 500हून अधिक MG Astor ग्राहकांकडे सुपूर्द, कंपनीनं रचला विक्रम

एमजी एस्टर कारची वैशिष्ट्य? 

एमजी मोटर इंडियाने वैयक्तिक एआय असिस्टंट आणि फर्स्ट-इन-सेगमेंट ऑटोनॉमस (लेव्हल 2) तंत्रज्ञानासह भारतातील पहिली एसयूव्ही एमजी ॲस्टर बाजारपेठेत आणली आहे. एमजी ॲस्टरच्या पहिल्या बॅचच्या कार्सच्या डिलिव्हरीला सुरुवात झाली आहे. 

सॉफ्ट-टच आणि प्रीमियम मटेरियलसह इंटिरिअर सुबक कलाकुसरीने तयार करण्यात आलं आहे. हे दोन इंजिन पर्यायांमध्ये येणार आहेत. एक ब्रिट डायनॅमिक 220 टर्बो पेट्रोल इंजिन ज्यात 6-स्पीड एटी आहे, जे तब्बल 220 एनएम टॉर्क आणि 140 पीएस पॉवर देते आणि दुसरं - मॅन्युअल ट्रान्समिशनसह व्हीटीआय टेक पेट्रोल इंजिन आणि 8-स्पीड सीव्हीटी, 144 एनएम टॉर्क आणि 110 पीएस पॉवर देते.

एमजी ॲस्टरच्या वैयक्तिक एआय असिस्टंटमध्ये मानवासारख्या भावना आणि आवाजाची वैशिष्ट्ये जोडली आहेत. पॅरालिम्पिक ॲथलिट दीपा मलिकने वैयक्तिक एआय सहाय्यकाला आपला आवाज दिला आहे, ज्याद्वारे हा अनुभव वैयक्तिक पातळीवर सुलभ होईल.

ॲस्टरमधील एआय तंत्रज्ञान एमजीच्या संभाव्यतेच्या कार-एज-ए-प्लॅटफॉर्म (सीएएपी) च्या दृष्टीकोनाभोवती विकसित केले गेले आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या गरजेनुसार सेवा अंगीकृत करणे शक्य होईल.

एमजीने एस्टरमधील एडीएएस (अ‌ॅडव्हान्स ड्रायव्हर-असिस्टन्स सिस्टम) साठी बॉशबरोबर भागीदारी केली आहे. एआय तंत्रज्ञान, सहा रडार आणि पाच कॅमेरे एसयूव्हीला 14 अॅडव्हान्स ऑटोनॉमस लेव्हल 2 वैशिष्ट्ये व्यवस्थापित करण्यासाठी सुसज्ज करतात.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली

व्हिडीओ

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Embed widget