एक्स्प्लोर
डिजिटल क्रांती! मास्टर कार्डचा 'मास्टर पास' लाँच
नवी दिल्ली : डिजिटल क्षेत्रात नवी क्रांती झाली असून मास्टर कार्डने १४ जुलैपासून नव्या ग्लोबल डिजिटल पेमेंट सर्व्हिसचा शुभारंभ केला आहे. या सुविधेमुळे ग्राहकांना पारंपरिक पेमेंटच्या पद्धतीतून मुक्ती मिळणार आहे. तसेच पेमेंटसाठी डिव्हाइसचा वापर कमी होऊन ग्राहक कधीही आणि कुठेही मुक्तपणे खरेदी करू शकणार आहेत.
या मास्टर पासच्या माध्यमातून मोबाईल पेमेंट, ट्रेनचे बुकींग, रेस्टॉरंटचे बिल पेमेंट, विमान प्रवासाच्या तिकीटाचे बुकींग आदी सहज करता येणार आहे.
सध्या मास्टर पास अनेक ऑनलाईन मर्चंटकडे उपलब्ध आहेत. यामध्ये फायरहाऊस सब्स, मसाबी, एमएलबी डॉट कॉम, एमएलबी शॉप डॉट कॉम, ऑफिस डिपो आणि पार्क मोबाईल यांचा समावेश आहे. तसेच 77 देशांमध्ये या मर्चंटची संख्या 50 लाखांच्या आसपास आहे.
मोबाईल बँकिंग अॅपच्या माध्यमातूनही मास्टर पासचा प्रयोग करणे सोपा होणार आहे. तसेच यामुळे जवळपास ८ कोटी अकाऊंट मास्टर पासच्या माध्यमातून ग्लोबली कनेक्ट होणार आहेत. ही डिजिटल पेमेंट क्षेत्रात मोठी क्रांती ठरणारी घटना आहे. मास्टर पासचे बँक ऑफ अमेरिकासारख्या मोठ्या बँकांशी सहकार्य करार असल्यामुळे तुम्हाला सुरक्षितपणे अॅडव्हान्स पेमेंट करणे शक्य होणार आहे. शिवाय यामुळे तुमची आर्थिक फसवणुकही टाळणे शक्य होणार आहे. कारण, यासाठी मास्टर पासने सर्व अॅडव्हान्स सेक्यूरिटीच्या सर्व तंत्रांचा वापर केलेला असल्याने ग्राहकांची फसवणुकीतून सुटका होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement