Top 5 Models : सर्वाधिक विक्री होणाऱ्या Maruti Suzuki च्या या आहेत टॉप पाच मॉडेल
Maruti Suzuki च्या एकूण विक्रीमध्ये या पाच मॉडेलचा हिस्सा 30 टक्के आहे. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल...
मुंबई : देशातली सर्वात मोठी कार उत्पादन करणारी कंपनी अशी ख्याती असलेल्या मारुती सुझुकीने 2020-21 या आर्थिक वर्षात त्यांच्या सर्वाधिक खपलेल्या पाच मॉडेल्सची नावे जाहीर केली आहेत. त्यामध्ये 1.72 लाख यूनिट विक्री करुन Maruti Suzuki Swift पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर Maruti Suzuki Baleno, WagonR, Alto आणि Dizire यांचा नंबर लागतोय.
गेल्या आर्थिक वर्षात मारुती सुझुकी स्विफ्ट नंतर बलेनोची 1.63 यूनिट्सने विक्री झाली. वॅगनआर 1.60 यूनिट्स विक्रीने तिसऱ्या स्थानावर आहे. चौथ्या क्रमांकावर अल्टो हे मॉडेल असून त्याची विक्री 1.59 इतक्या प्रमाणात झाली आहे. त्यानंतर डिझायरचा पाचवा क्रमांक लागत असून 1.28 लाख यूनिट्सची विक्री झाली आहे.
सलग चौथ्या वेळी टॉप 5 मॉडेल
मारुती सुझुकीच्या मते, 2020-21 मध्ये कंपनीच्या एकूण पॅसेन्जर व्हेईकलच्या एकूण विक्रीमध्ये या पाच मॉडेलची विक्री जवळपास 30 टक्के इतकी आहे. हे टॉप पाच मॉडेल हे सलग चौथ्या वर्षी बेस्ट सेलिंग मॉडेल राहिले आहेत.
ग्राहकांचा विश्वास कायम
मारुती सुझुकी इंडियाचे डायरेक्टर, मार्केटिंग अॅन्ड सेल्स शशांक श्रीवास्तव यांनी सांगितलं की या क्षेत्रात जरी स्पर्धा वाढत असली तरी 2020-21 साली सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप 5 मॉडेलमध्ये मारुती सुझुकीचा समावेश आहे. 2020 साल हे जगभरातल्या अर्थव्यवस्थेसमोर एक आव्हान घेऊन आलं होतं तरीही ग्राहकांचा मारुतीवरील विश्वास कायम आहे असंही शशांक श्रीवास्तव यांनी सांगितलं.
सुझुकीची सर्वाधिक विक्री होणाऱ्या मॉडल्समधील स्विफ्ट ही एक गाडी आहे. ग्राहकांना ही केवळ आकर्षकच करत नाही, तर आता नवं मॉडेलमध्ये मिळणाऱ्या फिचर्सनी याची उपयुक्तता आणखी वाढवली आहे. सर्वात खास गोष्ट म्हणजे, गाडीची किंमत. स्विफ्ट फेसलिफ्टच्या सुरुवातीच्या वर्जनमध्ये एलएक्सआयची किंमत 5.73 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच गाडीच्या टॉप मॉडेलची किंमत 8.41 लाख रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- महाराष्ट्रात 100 टक्के लसीकरण गरजेचं, लस पुरवठ्यासाठी राज्याला केंद्राची साथ हवी; राज ठाकरेंचं पंतप्रधानांना पत्र
- CBSE Board Exam 2021 : सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा होणार? पंतप्रधानांची दुपारी शिक्षणमंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक
- Qatar Drug Case | कतारमध्ये ड्रग्ज प्रकरणात बळीचा बकरा बनलेलं भारतीय दाम्पत्य दोन वर्षानंतर मुंबईला परतणार