एक्स्प्लोर

व्हॉट्सअॅपवरुन फेसबुक, इन्स्टाग्रामवरही मॅसेज पाठवता येणार!

आता व्हॉट्सअॅपवरुन फेसबुक, इन्स्टाग्रामवर, फेसबुकवरुन व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रामवर आणि इन्स्टाग्रामवरुन फेसबुक, व्हॉट्सअॅपवर मॅसेज पाठवता येणार आहे

न्यू यॉर्क : आता व्हॉट्सअॅपवरुन फेसबुक, इन्स्टाग्रामवर, फेसबुकवरुन व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रामवर आणि इन्स्टाग्रामवरुन फेसबुक, व्हॉट्सअॅपवर मॅसेज पाठवता येणार आहे. न्यूयॉर्क टाईम्सने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे. या वृत्तानुसार फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्गला ही नवी आयडीयाची कल्पना सुचली आहे. मार्कने फेसबुकच्या मालकीच्या तीनही सोशल मीडिया अॅप्सना एकमेकांशी जोडण्याचे ठरवले आहे. ही नवी प्रणाली फेसबुक कधी वापरात आणणार याबाबत अद्याप तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. यावर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ही सुविधा सुरु करण्याचे फेसबुकने ठरवले आहे. परंतु त्याच्या चाचण्या पूर्ण होण्यास कदाचित अधिक वेळ लागेल, असेही फेसबुकने म्हटले आहे. त्यामुळे ही सुविधा सोशल मीडिया युजर्सना मिळण्यास थोडा उशीर होईल. त्यामुळे 2020 च्या जानेवारी फेब्रुवारीदरम्यान ही सुविधा सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. सध्या फेसबुकचे युजर्स कमी होऊ लागले आहेत. त्यामुळे फेसबुकवरील युजर्सची संख्या व युजर्सचा फेसबुकवरील वेळ वाढावा यासाठी मार्कने ही नवी शक्कल लढवली आहे. या नव्या सुविधेमुळे फेसबुकवर वेळ घालवणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढणार आहे. या सुविधेमुळे फेसबुक हे गुगलच्या मॅसेंजिंग अॅप्स आणि अ‍ॅपलच्या आय मॅसेजला टक्कर देऊ शकेल. फेसबुकचे ऑर्कुट होऊ नये म्हणून... गुगलने ऑर्कुट हे मेसेजिंग अॅप सुरु केल्यानंतर अल्पावधितच प्रसिद्ध झाले. परंतु त्यामध्ये काळानुसार बदल करण्यात गुगल अपयशी ठरले होते. त्यामुळे काळाच्या ओघात ऑर्कुट मागे पडले. गेल्या काही महिन्यांपासून फेसबुकचे युजर्स कमी झाले आहेत. तसेच फेसबुकवर असंख्य युजर्स असे आहेत ज्यांनी फेसबुकचा वापर खूप कमी केला आहे. त्यामुळे फेसबुकचीदेखील ऑर्कुटसारखी गत होईल, असे बोलले जात आहे. त्यामुळेच फेसबुकच्या सर्वेसर्वा मार्क झुकरबर्गने फेसबुकला नवसंजीवनी देण्यासाठी ही नवी शक्कल लढवली आहे. तीनही अॅप्स सुरक्षित नवी मॅसेजिंग प्रणाली सुरु झाल्यानंतर लोकांची प्रायव्हसी आणि सुरक्षितता धोक्यात येईल असे बोलले जात आहे. परंतु फेसबुकच्या टीमने त्याचे खंडण केले आहे. मॅसेज पाठिवण्याची नवी प्रक्रिया एंड टू एंड एनक्रिप्टेड म्हणजे सुरक्षित असणार आहे. ही प्रणाली आजही व्हॉट्सअ‍ॅपमध्ये वापरली जाते. या प्रणालीमुळे व्हॉट्सअॅपवरील मॅसेज कोणीही हॅक करू शकत नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget