एक्स्प्लोर
कार्बनचे दोन स्मार्टफोन लाँच, किंमत 10 हजारांपेक्षाही कमी
नवी दिल्लीः कार्बनने आज फॅशन आय आणि फॅशन आय 2.0 हे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. 'स्टॉक' नावच्या फॅशन कंपनीसोबत मिळून कार्बनने हे दोन्ही फोन बाजारात आणले आहेत. फॅशन आयची किंमत 5 हजार 490 रुपये आहे, तर फॅशन आय 2.0 ची किंमत 6 हजार 490 रुपये ठेवण्यात आली आहे.
कार्बनने या फोनमध्ये प्रीलोडेड फॅशन अॅप दिले आहेत. वापरकर्ते यामध्ये वेगवेगळे आटफीट्स सर्च करु शकतात. या फोनचा एआय सर्च पॅटर्न जबरदस्त असल्याचं बोललं जात आहे. ऑनलाईन शॉपिंग साईटप्रमाणेच यामध्ये विविध प्रकारचे फॅशन आऊटफीट्स सर्च करता येणार आहेत.
फीचर्सः
- 5 इंच आकाराची एचडी स्क्रीन
- 1.3GHz क्वाड-कोअर प्रोसेसर
- 1 GB रॅम
- 8 GB इंटर्नल स्टोरेज
- 8 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 2 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- 2000mAh क्षमतेची बॅटरी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement