एक्स्प्लोर

केवळ 1,999 रुपये द्या आणि JioPhone Next विकत घ्या, Jio च्या चार स्मार्टफोन्सची घोषणा

JioPhone Next : रिलायन्स जिओचे चार स्मार्टफोन्स बाजारात आले असून ते अगदी स्वस्त दरात उपलब्ध होत आहेत. 

JioPhone Next : रिलायन्स जिओच्या बहुचर्चित जिओफोन नेक्स्ट या स्मार्टफोनची अखेर घोषणा झाली आहे. हा 4G स्मार्टफोन केवळ 1,999 रुपये देऊन खरेदी करता येणार आहे. बाकीची रक्कम ही EMI च्या माध्यमातून भरता येणार आहे. या स्मार्टफोनची किंमत ही 6,499 रुपये इतकी आहे. 

रिलायन्स जिओने चार विविध प्रकारचे फोन्सची घोषणा केली आहे. हे चारही स्मार्टफोन हे EMI च्या माध्यमातून खरेदी करण्यात येऊ शकतात. या EMI चा कालावधी हा 18 महिने ते 24 महिन्यांचा असेल.  JioPhone Next फोनसाठी हा EMI केवळ 300 रुपये ते 350 रुपयांपर्यंत असेल. त्यामध्ये दर महिन्याला पाच जीबी डेटा आणि 100 मिनीटं टॉकटाईमची सुविधा देण्यात येणार आहे.  

JioPhone Next Large plan साठी ग्राहकांना 18 महिन्यांसाठी 500 रुपये तर 24 महिन्यांसाठी 450 रुपयांचा EMI भरावा लागणार आहे. त्यामध्ये ग्राहकांना 1.5 GB 4G डेटा मिळणार आहे. 

तिसरा प्लॅन हा JioPhone Next XL या नावाचा आहे. यामध्ये ग्राहकांना 18 महिन्यांसाठी 550 रुपये आणि 24 महिन्यांसाठी 500 रुपयांचा EMI भरावा लागणार आहे. यामध्ये 2GB  हाय स्पीड 4G डेटाची सुविधा मिळणार आहे. तसेच अनलिमिटेड व्हॉईस कॉलची सुविधा मिळणार आहे. 

चौथ्या म्हणजे XXL या प्लॅनमध्ये ग्राहक 18 महिन्यांसाठी 600 रुपये तर 24 महिन्यांसाठी 550 रुपये EMI भरु शकतात. तसेच 2.5 GB  हाय स्पीड 4G डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलची सुविधा मिळणार आहे. 

जिओ फोन नेक्स्ट हा एक अल्ट्रा-अफोर्डेबल 4G स्मार्टफोन आहे. जो सिंगल रियर कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा सेट अपसह येईल. जिओ फोन नेक्स्ट 2G ते 4G कनेक्टिव्हिटीसह येईल. जिओ फोन नेक्स्ट Android 11 गो-एडिशन मिळेल. याशिवाय, फोनला 5.5-इंच एचडी डिस्प्ले मिळेल. क्वालकॉमची QM 215 प्रोसेसर, 2 किंवा 3 जीबी रॅम आणि फोनमध्ये 16 किंवा 32 जीबी स्टोरेज मिळेल. ग्राफिक्ससाठी Adreno 308 GPU मिळेल. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो आणि 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. फोनची बॅटरी 2,500 mAh असू शकते. JioPhone Next 4G VoLTE सपोर्टसह येऊ शकतो आणि त्यात ड्युअल-सिम सपोर्ट उपलब्ध असेल. 

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 26 January 2025ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 26 January 2024Shaurya Purskar ABP Majha | इतरांचे प्राण वाचवणाऱ्या शूरवीरांचा एबीपी माझाकडून गौरव ABP MajhaGadchiroli Naxal : नक्षल्यांचा खात्मा करणारी C-60 आहे तरी कोण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
Nashik : प्रजासत्ताक दिनी वनमजुराने डिझेल ओतून स्वतःला पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
प्रजासत्ताक दिनी वनमजुराने डिझेल ओतून स्वतःला पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
Embed widget