Reliance Jio : Jio च्या 'या' प्लॅनमध्ये यूजर्सना मिळणार Disney + Hotstar, Zee5, Sonyliv यांसारख्या अनलिमिटेड सुविधा, वाचा सविस्तर
Reliance Jio best plan : अनलिमिटेड मनोरंजन स्किम अंतर्गत, Jio यूजर्सना वेगवेगळ्या सुविधा मिळणार आहेत.
Reliance Jio best plan : Reliance Jio नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना आणत असतात. नुकतीच jio ने अशीच एक योजना जाहीर केली आहे. ज्यामध्ये पोस्टपेड ग्राहकांसाठी 399 रुपयांच्या अनलिमिटेड इंटरनेट कनेक्टिव्हिटीसह नवीन 'झिरो एंट्री कॉस्ट' स्किम आहे. या प्लॅनमध्ये 100 रुपयांचा मनोरंजन प्लॅन देखील जोडला जाऊ शकतो. ही स्किम येत्या 22 एप्रिलपासून सुरु होणार आहे.
टेलिकॉम कंपनी आपल्या यूजर्ससाठी 399 रुपये प्रति महिना पासून सुरू होणाऱ्या नवीन प्लॅनमध्ये अनलिमिटेड इंटरनेट देखील देत आहे. जिओच्या 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना 30 Mbps स्पीड मिळतो. यामध्ये यूजर्सना अनलिमिटेड इंटरनेट मिळत आहे. त्याची वैधता 30 दिवसांची आहे.
अनलिमिटेड मनोरंजन स्किम अंतर्गत, Jio ग्राहकांना 14 OTT अॅप्समध्ये प्रवेश मिळेल, जे मोठ्या किंवा छोट्या स्क्रीनवर आणि एकाधिक डिव्हाइसवर वापरले जाऊ शकतात. 14 अॅप्समध्ये Disney+ Hotstar, Zee5, Sonyliv, Voot, Sunnxt, Discovery+, Hoichoi, ALTBalaji, Eros Now, Lionsgate आणि ShemarooMe, Universal+, Voot Kids, JioCinema यांचा समावेश आहे.
जिओ यूजर्स दरमहा 399 रुपयांच्या बेस प्लॅनद्वारे अनलिमिटेड इंटरनेट वापरू शकतात. मनोरंजन प्लॅन अंतर्गत, ग्राहकांना प्रत्येक महिन्याला 100 रुपये स्वतंत्रपणे देऊन ग्राहकांना 6 OTT मिळतील. त्याच वेळी, यूजर्स 200 रुपये प्रति महिना योजना अपग्रेड करू शकतात आणि सर्व उपलब्ध 14 OTT अॅप्स वापरू शकतात.
महत्वाच्या बातम्या :
- Instagram Down : भारतासह जगभरात इंस्टाग्राम डाऊन; यूझर्सना अडचणींचा सामना, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस
- Amazon Sale : Oppo च्या या स्मार्टफोनवर लॉन्च होताच 20 हजार रुपयांपर्यंतची डिस्काउंट ऑफर उपलब्ध, वाचा सविस्तर
- Amazon Sale : Alexa वर आधारित हा आहे OnePlus चा नवीन स्मार्टफोन, ऑफरमध्ये मिळतेय चक्क 25 हजारांपर्यंत सूट!
- Lenovo Tablet On Amazon : आनंदाची बातमी! 'या' Lenovo टॅबलेटवर मिळतेय चक्क 50 टक्क्यांची सूट