(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Instagram Down : भारतासह जगभरात इंस्टाग्राम डाऊन; यूझर्सना अडचणींचा सामना, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस
Instagram Down : इंस्टाग्राम याआधीही अनेकदा डाऊन झाले आहे. यावेळी वापरकर्त्यांना फीड लोड करताना समस्या येतात.
Instagram Down : सोशल मीडियाचे इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्म मंगळवारी रात्री उशिरा डाऊन झाले, त्यामुळे कोट्यवधी यूझर्स नाराज झाले. मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री 10.40 च्या सुमारास इन्स्टाग्राम डाऊन झाले. प्रोफाइल पेजसह होम फीडमध्ये यूजर्सना समस्या येत होत्या. त्यावेळी अनेक युझर्स ट्विटरवर येऊन प्रतिक्रिया तसेच मिम्सच्या माध्यमातून आपल्या समस्या शेअर करताना दिसले
Insta people coming to Twitter#InstagramDown pic.twitter.com/ZwuvPmtbtw
— Radha (@PK_Radha1) April 19, 2022
भारतासह जगभरातील यूझर्स इन्स्टाग्राम फीड रिफ्रेश करू शकले नाहीत. मात्र त्यानंतर काही मिनिटांनंतर त्याचे निराकरण झाले आणि यूझर्सनी पूर्वीप्रमाणेच Instagram वापरण्यास सुरुवात केली. त्याचवेळी, इंस्टाग्राम डाऊन करण्याबाबत ट्विटरवर युजर्सच्या अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. एका यूझरने लिहिले की, 'तुमचे वायफाय डाऊन नाही तर इंस्टाग्राम डाऊन आहे.' त्याचवेळी दुसऱ्या यूझरने लिहिले की, 'इन्स्टाग्राम डाउन आहे, आता मी लवकर झोपेन...'
Is it really #instagramdown ..?
— Ashutosh Srivastava (@kingashu1008) April 19, 2022
Meanwhile me using Twitter pic.twitter.com/XHQ8YBwJqs
इंस्टाग्राम यापूर्वीही अनेकदा डाऊन झाले आहे
माहितीनुसार, इंस्टाग्राम याआधीही अनेकदा डाऊन झाले आहे. यावेळी वापरकर्त्यांना फीड लोड करताना समस्या येतात. वापरकर्ते प्लॅटफॉर्मवर फोटो, व्हिडिओ किंवा लाइव्ह यासारख्या गोष्टी करू शकत नाहीत. काहीवेळा ही समस्या काही मिनिटांत दूर होते, तर कधी तासन्तास डाऊन होते.
#facebookdown and #instagramdown down
— Chris Maraiya (@chrismaraiya) April 19, 2022
Mark Zuckerberg right now... pic.twitter.com/gtOhn33pj8
Walking into Twitter to see if Instagram is down #instagramdown pic.twitter.com/0pj5KA1aMz
— Mawa_Jalebi (@HighnPositive) April 19, 2022
Instagram Influencers be like: #instagramdown pic.twitter.com/C8GQBp660h
— Andy (@iamandy1987) April 20, 2022