एक्स्प्लोर
'इस्रो'ने रचला 'वजनदार' इतिहास, GSLV MK-3 चं यशस्वी प्रक्षेपण
श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (इस्रो) आणखी एक मोठा इतिहास रचला आहे. इस्त्रोनं श्रीहरीकोटातून सर्वात वजनदार जीएसएलव्ही मार्क-3 चं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे.
जीएसएलव्ही मार्क-3 संध्याकाळी 5 वाजून 28 मिनिटांनी यशस्वीरित्या अंतराळात झेपावलं. याआधी 2 हजार 300 किलोहून अधिक वजनाचे उपग्रह अंतराळात सोडण्यासाठी इस्त्रोला इतर देशांवर अवलंबून राहावं लागत होतं.
https://twitter.com/isro/status/871733569672097792
जीएसएलव्ही मार्क-3 च्या यशस्वी प्रक्षेपणामुळे भारताला चार टनाहून जास्त वजनाच्या उपग्रहांचं प्रक्षेपण करणं शक्य होणार आहे. यामुळे भारतासमोर अंतराळ संशोधनाच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत
जीएसएलव्ही मार्क-3 चे वैशिष्ट्य :
- तीन टनाहून अधिक वजन
- अहमदाबादेत निर्मिती
- भारतात बनवलेलं आणि प्रक्षेपण करण्यात आलेलं सर्वात वजनदार उपग्रह
- स्वदेशी लीथियम आयन बॅटरींद्वारे चालणार
- इंटरनेट स्पीड आणि कनेक्टिव्हिटीमध्ये वाढ होण्यास मदत होईल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
शेत-शिवार
राजकारण
Advertisement