एक्स्प्लोर
Advertisement
भारतीयांवर पाळत ठेवल्याचा व्हॉट्सअॅपचा आरोप, व्हॉट्सअॅपकडून इस्राईलच्या ‘एनएसओ’कंपनीवर खटला दाखल
व्हॉट्सअॅपने सायबर हेरगिरीचा प्रकार असल्याचं सांगत कॅलिफोर्नियातील संघराज्य न्यायालयात हा खटला दाखल केला आहे. एनएसओ या तंत्रज्ञान समूहाने 1400 यंत्रांमध्ये म्हणजेच मोबाइलमध्ये धोकादायक मालवेअर घुसवले आले आहे.
नवी दिल्ली : भारतातील अनेक विचारवंत, शिक्षण तज्ञ, दलित कार्यकर्ते, मानवी हक्क कार्यकर्ते आणि पत्रकार यांच्यावर पाळत ठेवल्याचा आरोप फेसबुकच्या इंस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने केला आहे. सायबर हेरगेरीचा हा प्रकार असून या संबधी व्हॉट्सअॅपने इस्त्रायलच्या ‘एनएसओ या तंत्रज्ञान समूहावर हा खटला भरला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार लोकसभा निवडणुकीच्या काळात म्हणजे 20 एप्रिल ते 10 मे या कालावधीत करण्यात आला आहे.
व्हॉट्सअॅपने सायबर हेरगिरीचा प्रकार असल्याचं सांगत कॅलिफोर्नियातील संघराज्य न्यायालयात हा खटला दाखल केला आहे. एनएसओ या तंत्रज्ञान समूहाने 1400 यंत्रांमध्ये म्हणजेच मोबाइलमध्ये धोकादायक मालवेअर घुसवले आले आहे. या हेरगिरीसाठी एनएसओ समुहानं 'पीगॅसस' नावाच्या सॉफ्टवेअरचा वापर केला आहे. व्हॉट्सअॅपचे प्रमुख विल कॅथकार्ट म्हणाले, जवळपास जगातील किमान 100 मानवी हक्क कार्यकर्ते, पत्रकार आणि महत्त्वाच्या व्यक्तींची माहिती चोरुन त्यांच्यावर पाळत ठेवली आहे.
इस्राइल समूहाने हे आरोप फेटाळले असले तरी मे महिन्यात 100 यूजर्सवर सायबर हल्ला करण्यात आला. एनएसओ बनवलेले पीगॅसस नावाचे सॉफ्टवेअर फोनमधील कॅमेरा, मायक्रोफोनद्वारे युजरची सगळीच माहिती काढून घेतो आणि नंतर तीच माहिती डेव्हलपर्सकडे पाठवतो. व्हॉट्सअॅपने मे महिन्यात वापरकर्त्यांना व्हॉट्सअॅप अपडेट करण्यास सांगितले. व्हॉट्सअॅपचे एकूण 1.5 अब्ज कार्यकर्ते आहे. 20 एप्रिल ते 10 मे दरम्यान आलेल्या अपडेटदरम्यान एनएसओ तंत्रज्ञान गटाने मालवेअर सोडले. एक्सप्लॉईट लिंक या नावाचा पर्याय जर तुम्ही कळत नकळत क्लिक केलात तर पीगेसस तुमच्या मोबाईल मध्ये प्रवेश करतो. त्यानंतर व्हाट्सअपने कितीही सुरक्षिततेचे उपाय योजले, तरी तुमचे मेसेज पीगेसस वाचू शकतो
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना राहण्याचे, जगण्याचे, खाण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. मात्र, या स्वातंत्र्यावरच घाला घालण्याचा प्रयत्न मोदी सरकारने सुरु केला आहे. भारतातले अनेक विचारवंत, शिक्षण तज्ञ, दलित कार्यकर्ते, मानवी हक्क कार्यकर्ते, आणि पत्रकार यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांच्या खासगी आयुष्यावर पाळत ठेवली जात आहे. हे पाळत ठेवण्याचे काम इस्रायलच्या एन एस ओ समूहाने भारत सरकारच्या परवानगीनेच सुरु केले आहे. त्यामुळे सरकारनेच भारतीयांच्या खासगी जीवनात डोकावण्यास सुरुवात केली आहे. संविधानाने दिलेले व्यक्तीस्वातंत्र्य नष्ट करण्याचा डाव या पाताळयंत्री हुकुमशाहीने रचला आहे. ही हेरगिरी आम्ही खपवून घेणार नाही, त्याविरोधात लढा उभारु, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
बातम्या
निवडणूक
Advertisement