एक्स्प्लोर

प्रतिक्षा संपली! Apple चा मेगा इव्हेंट उद्या, iPhone 13 सीरीजसह इतरही अनेक प्रोडक्ट्स लॉन्च होण्याची शक्यता

iPhone 13 Launch Event : उद्या Apple चा बहुप्रतिक्षित लॉन्च इव्हेंट होणार आहे. यामध्ये iPhone 13 सीरीजसह इतरही अनेक प्रोडक्ट्स लॉन्च होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

iPhone 13 Launch Event : Apple iPhone युजर्सची यावर्षीची प्रतिक्षा संपणार आहे. उद्या कंपनीचा यावर्षीचा मोठा लॉन्च इव्हेंट आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये iPhone 13 सीरीजसह अनेक प्रोडक्ट्स लॉन्च करण्यात येण्याची शक्यता आहे. कंपनीनं यंदाच्या लॉन्च इव्हेंटचं टायटल "California Streaming" असं ठेवलं आहे. या इव्हेंट्ससाठी इन्वाइट्सही पाठवण्यात आले आहेत. या मेगा इव्हेंटमध्ये सर्वांच्या नजरा कंपनीच्या नव्या आयफोनकडे लागल्या आहेत. याव्यतिरिक्त कंपनी आणखी काही प्रोडक्ट्स लॉन्च करण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया उद्या अॅपलचा हा मस्ट अवेटेड इव्हेंट किती वाजता पार पडणार? आणि युजर्स कुठे पाहू शकणार? 

कुठे आणि किती वाजता पाहू शकणार इव्हेंट?

Apple iPhone चा मेगा इव्हेंट "California Streaming" भारतीय वेळेनुसार, उद्या रात्री 10.30 वाजता आयोजित करण्यात येईल. जर तुम्हालाही या लॉन्च इव्हेंटमध्ये सहभागी व्हायचं असेल, म्हणजेच, हा इव्हेंट लाईव्ह पाहायचा असेल, तर तुम्ही कंपनीची वेबसाईट आणि कंपनीच्या ऑफिशियल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. 

Apple iphone 13 Series

Apple ची आगामी आयफोन 13 सीरिज लवकरच लाँच होणार आहे. ही सीरिज 14 सप्टेंबर रोजी लॉन्च केली जाणार आहे. या सीरिजमध्ये कंपनी iphone 13, iphone 13 pro, iphone 13 Pro Max आणि iphone 13 Mini लॉन्च करु शकते. कंपनी आपल्या स्मार्टफोनमध्ये अनेक लेटेस्ट फीचर्स आणत आहे, त्यातील सर्वात खास बात म्हणजे लो-अर्थ-ऑर्बिट (LEO) सॅटेलाइट कम्युनिकेशन मोड. या विशेष तंत्रज्ञानाअंतर्गत, यूजर्स नेटवर्कशिवाय देखील कॉल आणि मेसेज करू शकतात. 

नेटवर्कशिवाय कॉल करू शकतो

अॅपल आयफोन 13 सीरिजच्या स्मार्टफोनमध्ये येणारे हे विशेष तंत्रज्ञानामुळे यूजर्सना 4G/5G नेटवर्क स्मार्टफोनमध्ये येतं की नाही याची चिंता करण्याची गरज नाही. कारण नेटवर्क नसेल तरी मेसेज पाठवण्याची आणि फोन कॉल करण्याची सुविधा या फोनमध्ये देण्यात येईल. जर तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचे तर वापरकर्ते नेटवर्कशिवाय कोणालाही कॉल किंवा मेसेज पाठवू शकतील. अडचणीच्या वेळी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरेल. Apple ने 2019 मध्ये LEO Satellite X iPhone ची अंमलबजावणी सुरू केली, परंतु कंपनी पहिल्यांदाच आपल्या कोणत्याही स्मार्टफोनमध्ये हे विशेष वैशिष्ट्य देत आहे.

नव्या स्मार्टफोनमधील फीचर्स

Apple चे हे iPhones iOS 15, A15 bionic वर काम करतील. यामध्ये, इमेज प्रोसेसिंगसाठी लिक्विड क्रिस्टल पॉलिमर सर्किट बोर्ड व्यतिरिक्त, नाईट मोड कॅमेरा दिला जाऊ शकतो. नवीन क्वालकॉम एक्स 60 मॉडेल आणि वायफाय 6 ई सपोर्ट मिळण्याची अपेक्षा आहे. 120Hz रिफ्रेश रेटसह डिस्प्ले iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max मध्ये दिला जाऊ शकतो. यामध्ये 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळण्याची शक्यता आहे. आयफोन 13 सीरिजला mmWave 5G साठी सपोर्ट मिळू शकतो. या वर्षी अनेक देशांना mmWave 5G कव्हरेज मिळणे सुरू होईल, जेणेकरून वापरकर्ते आयफोन 13 द्वारे हाय-स्पीड 5G कनेक्टिव्हिटीचा आनंद घेऊ शकतील. इतर 5G नेटवर्कपेक्षा mmWave नेटवर्कवर इंटरनेट स्फीड जास्त उपलब्ध आहे. पण त्याची किंमत देखील जास्त आहे.

या स्मार्टफोनची किंमत असेल

आयफोन 13 च्या किंमतीबद्दल बोलायचे तर हा फोन Apple कमी किंमतीत लाँच करेल. रिपोर्ट्सनुसार, आगामी सीरिजची किंमत आयफोन 12 पेक्षा कमी असेल. आयफोन 13 च्या 4 जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत $ 973 पर्यंत असेल म्हणजेच सुमारे 71,512 रुपये, जे आयफोन 12 च्या किंमतीपेक्षा 3,000 रुपयांपेक्षा कमी असेल. या व्यतिरिक्त, तुम्ही आयफोन 13 चे 128 जीबी मॉडेल 1051 डॉलर म्हणजेच सुमारे 77,254 रुपयांमध्ये खरेदी करू शकाल. तसेच, 256GB व्हेरिएंटची किंमत $ 1174 म्हणजेच 86,285 रुपये असू शकते. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget