Infinix Smart 6: 4GB रॅम आणि अँटी-बॅक्टेरियल बॅक पॅनलसह स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
Infinix Smart 6 Smartphone : Infinix Smart 6 नुकताच भारतात लॉन्च झाला आहे. Infinix चा बजेट स्मार्टफोन 6 मे पासून मार्केटमध्ये विक्रीसाठी सज्ज आहे.
Infinix Smart 6 Smartphone : तुम्ही जर बजेड फ्रेंडली मोबाईलच्या शोधात असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय घेऊन आलो आहोत. Infinix Smart 6 नुकताच भारतात लॉन्च झाला आहे. Infinix चा बजेट स्मार्टफोन 6 मे पासून मार्केटमध्ये विक्रीसाठी सज्ज आहे. स्मार्ट 6 अँटी-बॅक्टेरियल बॅक पॅनलसह हा स्मार्टफोन येतो. या स्मार्टफोनला 6.6-इंचाचा वॉटरड्रॉप सनलाइट डिस्प्ले आहे. याबरोबर हँडसेट MediaTek Helio A22 क्वाड-कोर SoC प्रोसेसरसह येतो आणि Android 11 वर काम करतो. कंपनीचा असा दावा आहे की, Smart 6 मध्ये ड्युअल फ्लॅश आणि DTS ऑडिओ प्रोसेसिंगसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि चांगल्या ऑडिओ अनुभवासाठी Beez 2.0 आहे. हा स्मार्टफोन फिंगरप्रिंट आणि फेस-अनलॉक या दोन्ही ऑप्शनसह येतो. Infinix Smart 6 चार कलर व्हेरियंटमध्ये उपलब्ध असेल.
Infinix Smart 6 Smartphone Features :
Dual-SIM (Nano) Infinix Smart 6 Android 11 Go व्हर्जन बेस XOS 7.6 वर कार्य करते. Infinix Smart 6 मध्ये 4GB (2GB + 2GB व्हर्च्युअल रॅम) आणि 64GB इंटर्नल स्टोरेज आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, त्याचा मागील पॅनल अँटी-बॅक्टेरियल मटेरियलपासून बनवला आहे.
Infinix Smart 6 Smartphone Specification :
यात AI सह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात डबल LED सह 8-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये LED फ्लॅशसह 5 मेगापिक्सेलचा AI सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. चांगल्या ऑडिओ अनुभवासाठी, Infinix Smart 6 ला DTS-HD सराउंड साउंड आणि Beez 2.0 देखील मिळतो. स्मार्टफोन ब्लूटूथ v5.0 ला सपोर्ट करतो आणि अॅम्बियंट लाईट सेन्सर, जी-सेन्सर आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर देखील मिळतो. Infinix ने 5,000mAh बॅटरीसह Smart 6 लॉन्च केला आहे. कंपनीचा दावा आहे की, एका चार्जरवर हा स्मार्टफोन 30 तासांहून अधिक काळ चालू शकतो.
किंमत आणि कलर :
या स्मार्टफोनची किंमत फक्त 7,999 रुपये आहे. तुम्हाला हा स्मार्टफोन चार वेगवेगळ्या कलरमध्ये मिळू शकतो. यामध्ये हार्ट ऑफ ओशन, लाइट सी ग्रीन, पोलर ब्लॅक आणि स्टाररी पर्पल कलर उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे लॉन्च होताच हा स्मार्टफोन फ्लिपकार्टच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असेल.
महत्वाच्या बातम्या :