Download Aadhaar Card : भन्नाटच! आता WhatsApp वरून डाऊनलोड करता येणार आधार आणि पॅन कार्ड; येथे आहे संपूर्ण प्रक्रिया
Download Aadhaar Card : भारत सरकारचे ई-गव्हर्नन्स पोर्टल MyGov Helpdesk वरून तुम्ही अनेक प्रकारच्या सेवांचा लाभ घेऊ शकता. यामध्ये डिजीलॉकरच्या मदतीने पॅन आणि आधार देखील सहज डाऊनलोड करता येणार आहे.
Download Aadhaar Card : आजच्या काळात जवळपास प्रत्येकजण व्हॉट्सअपचा (WhatsApp) वापर करतो. व्हॉट्सअप हे असं एक लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. ज्याचे जगभरात अनेक यूजर्स आहेत. व्हॉट्सअॅपवर लोकांना अनेक सेवा दिल्या जातात. भारतीय रेल्वेमध्ये खाण्यापासून ते ऑनलाईन तिकीट बुक करण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी लोकांनी आता व्हॉट्सअॅप वापरण्यास सुरुवात केली आहे. व्हॉट्सअपचा अधिकाधिक वापर पाहता भारत सरकारनेही आता व्हॉट्सअॅपवर नागरिकांना काही सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. आता सरकारी कागदपत्र डाऊनलोड करण्यासाठीही व्हॉट्सअॅपचा वापर करता येणार आहे. त्यानुसार तुम्ही तुमचे आधार कार्ड (Aadhar Card) आणि पॅन कार्ड (Pan Card) WhatsApp वरूनच डाऊनलोड करू शकता. ही प्रक्रिया नेमकी कशी आहे या संदर्भात अधिक माहिती वाचा.
भारत सरकारचे ई-गव्हर्नन्स पोर्टल MyGov Helpdesk वरून तुम्ही अनेक प्रकारच्या सेवांचा लाभ घेऊ शकता. यामध्ये डिजीलॉकरच्या मदतीने पॅन आणि आधार देखील सहज डाऊनलोड करता येणार आहे. लोकांना डिजीलॉकरच्या विविध सेवा देण्यासाठी व्हॉट्सअॅपवर चॅटबॉटही सुरू करण्यात आला आहे. याच्या मदतीने तुम्ही व्हॉट्सअॅपवरच आधार आणि पॅन कार्ड डाऊनलोड करू शकता. याद्वारे प्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर नेले जाईल आणि त्यानंतर तुम्ही आधार आणि पॅन सहजपणे डाऊनलोड करू शकाल.
Digilocker वरून लिंक करा
सरकारच्या या व्हॉट्सअॅप चॅटबॉटद्वारे तुम्हाला तुमचे आधार कार्ड डाऊनलोड करायचे असल्यास, तुम्हाला तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड संबंधित सर्व माहिती डिजीलॉकरवर (Digilocker) सेव्ह करावी लागेल. यासाठी तुम्ही अँड्रॉइड किंवा iOS डिव्हाईसवर डिजिलॉकर अॅप डाउनलोड करून लॉग इन करू शकता. यानंतर, तुमचा नंबर वापरून, आधार आणि पॅन सेवा डिजीलॉकरशी लिंक करा.
पॅन आणि आधार कार्ड कसे डाऊनलोड कराल?
- WhatsApp द्वारे आधार कार्ड आणि पॅन कार्ड डाऊनलोड करण्यासाठी येथे नमूद केलेल्या स्टेप्स तुम्ही फॉलो करू शकता.
- सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर WhatsApp ओपन करा.
- 9013151515 मोबाईल नंबर कोणत्याही नावाने सेव्ह करा.
- आता या नंबरवर "हॅलो" चा मेसेज करा.
- चॅटबॉट तुम्हाला "डिजिलॉकर सर्व्हिसेस" किंवा "को-विन सर्व्हिसेस" यापैकी एक निवडण्यास सांगेल.
- तुम्ही ऑप्शनमध्ये DigiLocker निवडा.
- तुमचे डिजिलॉकर खाते आहे का? विचारल्यास 'हो' पाठवा.
- आता तुम्हाला तुमचा आधार क्रमांक विचारला जाईल.
- यानंतर, सर्व लिंक केलेल्या सेवा स्क्रीनवर दिसतील.
- आधार आणि पॅनच्या पर्यायातून नोंदणी क्रमांक फाईलवर क्लिक करा.
- यानंतर चॅटबॉट तुम्हाला तुमच्या आधार आणि पॅन कार्डची PDF पाठवेल, जी तुम्ही डाऊनलोड करू शकता.
महत्वाच्या बातम्या :
व्हॉट्सअॅपने ऑक्टोबरमध्ये भारतात 23 लाख अकाउंट केले होते बंद, यूजर्सनी केल्या होत्या तक्रारी