एक्स्प्लोर
तुमचं आधार कार्ड कुठे-कुठे वापरलं जातंय? असं चेक करा
पडताळणी करण्याची सुविधा आधार प्राधिकरणाने दिली आहे. Uidai च्या वेबसाईटवर तुम्ही ही माहिती पाहू शकता.

मुंबई : तुमच्या आधार कार्डची जी माहिती आहे, ती अत्यंत गोपनीय आहे. त्यामुळे ही माहिती किंवा तुमचं आधार कार्ड कुठे वापरलं तर जात नाही ना, याची पडताळणी करण्याची सुविधा आधार प्राधिकरणाने दिली आहे. Uidai च्या वेबसाईटवर तुम्ही ही माहिती पाहू शकता. बँक, मोबाईल नंबर, पॅन कार्ड आणि इतर कल्याणकारी योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. बँकेसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी आधार कार्ड वापरलं जात असल्याने त्याची खबरदारी बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही आधार कार्ड कुठे कुठे वापरलं जातंय, ते पाहू शकता. आधार कार्ड कुठे-कुठे वापरलं जातंय? आधार प्राधिकरणाच्या https://uidai.gov.in या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला Aadhar authentication history हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर नवीन टॅब ओपन होईल.
या नव्या टॅबमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि त्याखाली समोरच दिलेला सिक्युरिटी कोड टाकावा लागेल. सिक्युरिटी कोड टाकल्यानंतर तुमच्या आधार डेटाबेसशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. पुढे गेल्यानंतर तुम्हाला नेमकी कोणत्या प्रकारची माहिती हवी आहे, तो पर्याय निवडावा लागेल. सर्व प्रकारची माहिती हवी असल्यास All हा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर किती तारखेपासून किती तारखेपर्यंतची माहिती पाहिजे, याचा उल्लेख करा.
तारीख निवडल्यानंतर किती नोंदी पाहिजे (उदाहरणार्थ 50) हा पर्याय निवडा. ही सर्व माहिती भरुन झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून पुढे जा. त्यानंतर तुम्हाला सर्व तपशील दाखवला जाईल, ज्यामध्ये तुमचं आधार कार्ड कुठे कुठे वापरलं गेलं, याची माहिती मिळेल. तुम्हाला मिळालेल्या माहितीमध्ये काही शंका वाटल्यास त्याची तक्रार करण्याचा अधिकार तुम्हाला आहे. 1947 या क्रमांकावर आधार प्राधिकरणाला संपर्क साधून तुम्ही तुमचं म्हणणं मांडू शकता.
या नव्या टॅबमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि त्याखाली समोरच दिलेला सिक्युरिटी कोड टाकावा लागेल. सिक्युरिटी कोड टाकल्यानंतर तुमच्या आधार डेटाबेसशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. पुढे गेल्यानंतर तुम्हाला नेमकी कोणत्या प्रकारची माहिती हवी आहे, तो पर्याय निवडावा लागेल. सर्व प्रकारची माहिती हवी असल्यास All हा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर किती तारखेपासून किती तारखेपर्यंतची माहिती पाहिजे, याचा उल्लेख करा.
तारीख निवडल्यानंतर किती नोंदी पाहिजे (उदाहरणार्थ 50) हा पर्याय निवडा. ही सर्व माहिती भरुन झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून पुढे जा. त्यानंतर तुम्हाला सर्व तपशील दाखवला जाईल, ज्यामध्ये तुमचं आधार कार्ड कुठे कुठे वापरलं गेलं, याची माहिती मिळेल. तुम्हाला मिळालेल्या माहितीमध्ये काही शंका वाटल्यास त्याची तक्रार करण्याचा अधिकार तुम्हाला आहे. 1947 या क्रमांकावर आधार प्राधिकरणाला संपर्क साधून तुम्ही तुमचं म्हणणं मांडू शकता. आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
व्यापार-उद्योग
छत्रपती संभाजी नगर