एक्स्प्लोर
गूगलचे पिक्सेल, पिक्सेल XL स्मार्टफोन लाँच

सॅन फ्रान्सिस्को (अमेरिका) : गूगलने अमेरिकेत मच अवेटेड स्मार्टफोन पिक्सेल आणि पिक्सेल XL लाँच केले आहेत. भारतात या फोन्सची बुकिंग येत्या 13 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. फ्लिपकार्ट, रिलायन्स डिजिटल आणि क्रोमा या वेबसाईटवर या फोन्सची बुकिंग करता येणार आहे.
पिक्सेल आणि पिक्सेल XL हे ब्ल्यू, ब्लॅक आणि सिल्व्हर अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध आहेत. गूगलने नेक्सस या फोननंतर पिक्सेल आणि पिक्सेल XL हे दोन्ही फोन बाजारात आणले आहेत. हे फोन एचटीसीकडून तयार करण्यात येतील.
गूगलची अॅपलला टक्कर?
पिक्सेल आणि पिक्सेल XL बाजारात 5 इंच आणि 5.5 इंच स्क्रिनमध्ये उपलब्ध असतील. गूगलच्या पिक्सेल आणि पिक्सेल XL या दोन्ही फोन्सची किंमत 57 हजार रुपयांपासून सुरु होणार आहे. त्यामुळे एका प्रकार गूगलने अॅपलला टक्कर दिली जात असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे सॅमसंग आणि इतर कंपन्यांसोबतही गूगलची स्पर्धा असणार आहे.
दमदार बॅटरी क्षमता
गूगलच्या पिक्सेल फोन्सची बॅटरी दमदार आहे. केवळ 15 मिनिट चार्ज होणार असून 7 तासांचा बॅकअप आहे. व्हिडिओ क्वालिटीसाठी यामध्ये व्हिडिओ स्टेबिलायझर देण्यात आलं आहे. पिक्सलच्या कॅमेऱ्यातून कमीत कमी सेकंदात फोटो काढता येतील. तसंच HDR+ पेक्षा पिक्सलच्या कॅमेऱ्याची क्वालिटी चांगली असेल, असा दावाही गूगलने केला आहे.
फीचर्सः
- अल्यूमिनिअम बॉडी
- 2x2.15GHz आणि 2x1.6GHz क्वाड कोअर प्रोसेसर
- 4GB रॅम
- 32GB स्टोरेज
- 12 मेगापिक्सेलचा सेंसर
- 2700mAh आणि 3450mAh क्षमतेची बॅटरी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
व्यापार-उद्योग
कोल्हापूर
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
