Google Pixel 7 & 7 Pro : 50MP कॅमेऱ्यासह गूगलची बहुप्रतिक्षित Pixel 7 सीरिज लॉन्च; धमाकेदार फिचर्सची युजर्ससाठी पर्वणी
Google Pixel 7 & 7 Pro : गूगलनं बहुप्रतिक्षित गूगल पिक्सल 7 सीरीज लॉन्च केली आहे. दमदार फोनची गेल्या कित्येक दिवसांपासून युजर्स प्रतिक्षा करत होते.
Google Pixel 7 & 7 Pro : बहुप्रतिक्षित गूगल पिक्सल 7 सीरीज लॉन्च करण्यात आली आहे. कंपनीनं Made by Google इव्हेंटमध्ये Google Pixel 7 सीरिज लॉन्च केली आहे. गुगलने युजर्ससाठी प्री-ऑर्डरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सीरिजमधील 2 स्मार्टफोन Google Pixel 7 आणि Google Pixel 7 Pro व्यतिरिक्त, कंपनी स्मार्टवॉच Google Pixel Watch आणि इतर काही प्रोडक्टस ऑफर करत आहे. हे प्रोडक्ट्स कंपनीचं ऑनलाईन स्टोअर GoogleStore.com वरुन युजर्सना खरेदी करता येऊ शकतात.
Pixel 7 सीरिजला सिक्योरिटीसाठी Titan M2 चिपसेटसोबत लॉन्च करण्यात आलं आहे. या स्मार्टफोनसोबत 5 वर्षांचं सुरक्षा अपडेट देखील मिळणार आहे. Pixel 7 सीरीज या वर्षाच्या शेवटी Google One द्वारे VPN सह येईल. हे फीचर्स भारतातील युजर्ससाठी उपलब्ध असतीतील की, नाही हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. गूगलच्या इव्हेंटमध्ये पिक्सेल वॉच देखील शोकेस करण्यात आला आहे. हे पिक्सेल वॉच ब्लॅक, सिल्व्हर आणि गोल्ड कलर्समध्ये उपलब्ध आहे.
Three things to love about the new #Pixel7:
— Google (@Google) October 6, 2022
- More ways to make phone calls even better
- New camera features to help you perfect your photography skills
- A fresh design and new colors
That’s just the tip of the iceberg ↓ https://t.co/O7Oza6GERS #MadeByGoogle
Pixel 7 Pro चे फिचर्स
Pixel 7 Pro मध्ये 6.7 इंचाच्या डिस्प्लेसह ट्रिपल कॅमेरा देण्यात आला आहे. Pixel 7 Pro मध्ये अपग्रेडेड टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. Pixel 7 आणि Pixel 7 Pro चा फ्रंट कॅमेरा फेस अनलॉक फिचरसह देण्यात आला आहे. या दोन्ही फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरही देण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की, पिक्सल 7 वर मशीन लर्निंग 60 टक्के अधिक वेगानं चालते. जर या स्मार्टफोनच्या बॅटरीबाबत बोलायचं झालं तर कंपनीनं अद्याप याबाबत स्पष्ट केलेलं नाही.
Wrist candy gets an upgrade with Google Pixel Watch, which features a domed coverglass that is scratch-resistant & housing made with 80% recycled stainless steel. Bonus: customize it with various faces & bands. See image for more details → https://t.co/630WF9L6Sa #MadeByGoogle pic.twitter.com/WjmvFaXmGy
— Google (@Google) October 6, 2022
ऑटोमेटिक सजेस्ट करणार इमोजी
Pixel 7 वर व्हॉईस असिस्टंट देण्यात आला आहे. तुम्ही एखादं वाक्य टाईप करताच ते आपोआप इमोजी सुचवतील. Pixel 7 ची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, नवं फिचर एकाच वेळी ऑडिओ मेसेज त्याचवेळी ट्रांसक्रिप्ट करुन देईल. याशिवाय Pixel 7 च्या रेकॉर्डर अॅपमध्ये स्पीकर देखील उपलब्ध असतील.
दमदार स्मार्टफोनची किंमत काय?
Pixel 7 ची किंमत 599 डॉलर्सपासून (49,000 च्या आसपास) असेल. तर Pixel 7 Pro ची किंमत 899 डॉलर्सपासून (74,000 च्या आसपास) असेल.