Google Pixel 6a ची प्रीबुकिंग सुरु, तब्बल 10 हजारांचा मिळणार डिस्काउंट
Google Pixel 6a Price In India : गुगलचा लेटेस्ट फोन म्हणजेच, Pixel 6a चं प्रीबुकींग आजपासून सुरु झालं आहे. कंपनीनं याची किंमत आणि ऑफर्सबाबत माहिती जारी केली आहे.
Google Pixel 6a Price In India : गुगलचा पिक्सेल स्मार्टफोन (Google Pixel Smartphone) पुन्हा एकदा भारतीय बाजारपेठेत परतला आहे. कंपनीचा नवीन स्मार्टफोन Google Pixel 6a आता भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध होणार आहे. या फोनची विक्री लवकरच सुरू होणार असून कंपनीनं मे महिन्यात झालेल्या I/O कार्यक्रमात हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. यापूर्वी, कंपनीनं 2020 मध्ये भारतात Pixel 4a लॉन्च केला होता.
Pixel स्मार्टफोन व्यतिरिक्त, तुम्ही Pixel Buds आणि इतर Google डिव्हाइस देखील खरेदी करू शकता. Google Pixel 6a हा कंपनीच्या 6-सीरीजमधील सर्वात स्वस्त फोन आहे. चला जाणून घेऊया त्याची किंमत आणि इतर फीचर्स.
Google Pixel 6a किंमत आणि विक्री
Pixel 6a ची अधिकृत किंमत 43,999 रुपये आहे. तसेच, प्री-बुकिंग दरम्यान, तुम्ही हा फोन 39,999 रुपयांना खरेदी करू शकता. जर तुमच्याकडे अॅक्सिस बँकेचं कार्ड असेल तर तुम्ही ते आणखी स्वस्तात खरेदी करू शकतात. Axis Bank कार्ड आणि EMI व्यवहारांवर 4000 ची सूट उपलब्ध आहे.
28 जुलै रोजी हँडसेटची विक्री होणार आहे. Google या डिव्हाइसवर 6000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील दिला जात आहे. ही ऑफर Pixel उपकरणांसाठी आहे. दुसरीकडे, तुम्ही इतर फोनच्या एक्सचेंजवर 2000 रुपयांपर्यंत बचत करू शकता.
या फोनसह, जर एखाद्या व्यक्तीनं Nest Hub Gen2 किंवा Pixel Buds A मालिका किंवा Fitbit Inspire 2 खरेदी केलं तर त्याला फक्त 4,999 रुपये खर्च करावे लागतील. तुम्ही फ्लिपकार्टवरून 19,990 रुपयांना Pixel Buds Pro खरेदी करू शकता. हे उपकरण 28 जुलै रोजी देखील उपलब्ध होईल.
स्पेसिफिकेशन्स काय?
Google Pixel 6a मध्ये 6.1-inch ची FHD+ OLED स्क्रिन मिळते, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. भारतात हा स्मार्टफोन दोन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध होणार आहे. एक Charcoal आणि Chalk अशा दोन कलर्समध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध होणार आहे. हँडसेट Tensor GS101 चिपसेट वर काम करतो, जो दुसऱ्या पिक्सल 6-सीरीज फोन्सपैकी एक आहे. डिव्हाइस 6GB RAM + 128GB स्टोरेजसह येतो.
यामध्ये ड्युअल रियर कॅमेरा मिळतो. ज्याची मेन लेन्स 12MP चा आहे. दुसरा 12MP चा अल्ट्रा वाइड अँगल सेंसर आहे. फ्रंटमध्ये 8MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. गुगलचा हा डिव्हाइस Android 12 सोबत येणार आहे. यामध्ये 4,306mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हँडसेट Titan M2 चिपवर काम करतो.