एक्स्प्लोर
फ्लिपकार्टचा बंपर मोबाईल सेल, 2000 ते 4500 रुपयांची सूट
आयफोन XS, आयफोन X Max, आयफोन 8, आयफोन 8 प्लस, आयफोन 7, आयफोन 7 प्लस, आयफोन 6s, गुगल Pixel 2, गुगल Pixel 2 प्लस यांसारख्या अन्य स्मार्टफोनवरही हा बंपर सेल लागू असणार आहे

मुंबई : ऑनलाईन शॉपिंग कंपनी फ्लिपकार्ट आपल्या ग्राहकांसाठी पुन्हा एकदा बंपर सेल आणला आहे. हिवाळी मौसमाच्या पार्श्वभूमीवर कंपनीनं हा सेल आणला आहे. 26 ते 29 डिसेंबरपर्यंत हा सेल असणार आहे
या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोनवर भरघोस सूट मिळणार आहे. फ्लिपकार्टने या सेलमध्ये स्मार्टफोनवर एक्स्चेंज ऑफरची सोय दिली आहे. या सेलमध्ये अॅपलच्या आयफोन XR 59,600 रुपये तर 46,700 रुपयांमध्ये गुगल Pixel 3 मिळणार आहेत.
आयफोन XR : अॅपलचा लेटेस्ट मॉडेल आयफोन XRवर सध्या 2,000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. 256 जीबीचा हा स्मार्टफोन 74,900 रुपयांना खरेदी करता येणार आहे. बाजारात या स्मार्टफोनची किंमत 76,900 रुपये आहे. याशिवाय 128 जीबीचा मॉडेल 64,600 रुपयांना खरेदी करता येईल. तर 59,600 रुपयांना 64 जीबीचा मॉडेल खरेदी करता येईल.
गुगल Pixel 3 : या सेलमध्ये गुगल Pixel 3वर सध्या 4,500 रुपयांची सूट देण्यात आली आहे. 128 जीबीचा गुगल Pixel 3 आता 75,500 रुपयांना खरेदी करता येणार आहे. बाजारात या स्मार्टफोनची किंमत 80,000 रुपये आहे. तर 64 जीबीचा मॉडेल 66,500 रुपयांना मिळणार आहे.
गुगल Pixel 3XL : 128 जीबीचा गुगल Pixel 3XLची मूळ किंमत 92,000 रुपये. पण फ्लिपकार्ट आपल्याला 87,500 रुपयांना मिळणार आहे. तर 64 जीबीचा मॉडेल 78,500 रुपयांना मिळणार आहे. . बाजारात या स्मार्टफोनची किंमत 83,000 रुपये आहे.
आयफोन XS, आयफोन X Max, आयफोन 8, आयफोन 8 प्लस, आयफोन 7, आयफोन 7 प्लस, आयफोन 6s, गुगल Pixel 2, गुगल Pixel 2 प्लस यांसारख्या अन्य स्मार्टफोनवरही हा बंपर सेल लागू असणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
क्रिकेट
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
