एक्स्प्लोर
Advertisement
फ्लिपकार्टचा नवा सेल, 'या' स्मार्टफोनवर 11,001 रुपयांची सूट!
ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टनं आपल्या ग्राहकांसाठी 'New Pinch Days’ सेल आणला आहे.
मुंबई : ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टनं आपल्या ग्राहकांसाठी 'New Pinch Days’ सेल आणला आहे. या सेलमध्ये कंपनी अनेक प्रोडक्टवर भरघोस सूट देणार आहे. यामध्ये स्मार्टफोनवर खास ऑफरही असणार आहेत. फ्लिपकार्टचा हा सेल 15 डिसेंबर ते 17 डिसेंबरपर्यंत असणार आहे.
सेलमध्ये स्मार्टफोनसह इतर मोबाइल अॅक्सेसरीजवर देखील बरीच सूट मिळणार आहे. याशिवाय एचडीएफसी क्रेडिट अथवा डेबिट कार्डवरुन खरेदी केल्यास ग्राहकांना तात्काळ 10 टक्के डिस्काउंट मिळणार आहे. सेलमध्ये मोबाइल, लॅपटॉप, टीव्ही, वॉशिंग मशीन, फॅशन अॅक्सेसरीज यासारख्या अनेक प्रोडक्टचा समावेश असणार आहे.
पाहा कोणकोणत्या स्मार्टफोनवर ऑफर :
गुगल पिक्सल 2, HTC U11, LG V20, Mi Mix 2 या स्मार्टफोनवर बऱ्याच ऑफर आहेत. तसंच मोटो X4,सॅमसंग गॅलक्सी On Nxt,ओपो F3 प्लस , लेनेव्हो K8 प्लस ऑनर 9i या स्मार्टफोनवरही सूट मिळणार आहे.
Xiaomi Mi Mix 2: या सेलमध्ये शाओमीच्या या स्मार्टफोनवर 3000 रुपयांची सूट आहे. याची किंमत 35,999 रु. असून सेलमध्ये हा फोन 32,999 रुपयात खरेदी करता येणार आहे.
Google Pixel 2 (64GB): सेलमध्ये या फोनवर तब्बल 11,001 रुपयांची फ्लॅट सूट मिळणार आहे. या फोनची किंमत सध्या 61,000 रुपये आहे. पण आता हा फोन 39,999 रुपयात खरेदी करता येणार आहे. तसेच यावर 18,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरही देण्यात आली आहे.
Samsung Galaxy J3 Pro: 2 जीबी रॅम मॉडेल असलेला हा स्मार्टफोन 6,990 रुपयात खरेदी करता येणार आहे. ज्याची बाजारात किंमत 8,490 रुपये आहे. तर गॅलक्सी On Max हा सेल 14,990 रुपयात खरेदी करता येणार आहे.
Lenovo K8 Plus: फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये या स्मार्टफोनवर 2000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे आता हा स्मार्टफोन 8,999 रुपयात खरेदी करता येणार आहे.
Oppo F3 Plus: 22,990 रुपये किंमतीचा हा स्मार्टफोन आता 17,990 रुपयात खरेदी करता येणार आहे.
Samsung Galaxy On Nxt: फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये 17,999 रुपये किंमतीचा स्मार्टफोन 14,990 रुपयात खरेदी करता येईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
परभणी
क्राईम
भारत
राजकारण
Advertisement