एक्स्प्लोर
'आयडिया'ची कल्पना, 1 GB च्या किमतीत 15 GB डेटा
मुंबई : 'आयडिया' सेल्युलर कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी खुशखबर आणली आहे. 'फ्लिपकार्ट'वर 4G स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आयडियाचा 15GB 4G डेटा 1GB च्या किमतीत उपलब्ध होणार आहे.
फ्लिपकार्टवर निवडक 4G स्मार्टफोन्सच्या खरेदीवरच ही ऑफर उपलब्ध असेल. फ्लिपकार्टवर विक्रीला उपलब्ध असलेल्या सर्वच 4G स्मार्टफोन्सना ही ऑफर लागू नाही. त्यामुळे आयडियाच्या वेबसाईटवर लिस्ट असलेल्या निवडक 4G स्मार्टफोन्सपैकीच एक तुम्हाला फ्लिपकार्टवर विकत घ्यावा लागेल.
फोन खरेदीसोबतच तुम्ही आयडियाचे 4G सिम होल्डर असणं बंधनकारक आहे, तरच तुम्हाला ऑफरचा लाभ घेता येईल. आयडियाचा 15GB 4G डेटा तुम्हाला 1GB च्या किमतीत उपलब्ध होणार आहे.
ऑफरचा लाभ कसा घ्याल?
1. फ्लिपकार्टवरुन घेतलेल्या 4G स्मार्टफोनमध्ये आयडियाचं 4G सिम टाका.
2. http://i4all.ideacellular.com/offers/get-headerinfo.htm या लिंकवर क्लिक करा
3. लिंकवर तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करा
4. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर नेहमीप्रमाणे 1GB चा रिचार्ज करा. ऑफरनुसार तुमच्या अकाऊण्टमध्ये 14GB डेटा जमा होईल.
5. हा डेटा वापरण्यासाठी 28 दिवसांची मुदत आहे.
6. 31 मार्चपर्यंत तीन वेळा ग्राहक या ऑफरचा लाभ घेऊ शकतात.
पोस्टपेड ग्राहकांना 255 रुपयांच्या स्पेशल मन्थली पॅकमधून ही ऑफर मिळवता येईल. नव्या फोनमध्ये सिमकार्ड टाकल्यानंतर 48 ते 72 तासाच्या आत अॅक्टिव्हेट करणं आवश्यक आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement