एक्स्प्लोर
देशातील पहिल्या 'टेस्ला' कारची मुंबईकराकडून नोंदणी
टेस्लाची ही गाडी पूर्णपणे वीजेवर चालणारी आहे. पाच दरवाजे आणि अत्याधुनिक सुविधा असलेली ही गाडी 135 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने सुसाट चालते.
मुंबई : देशातील पहिल्या 'टेस्ला' कारची मुंबईतील उद्योगपतीने नोंदणी केली आहे. पूर्णपणे विजेवर चालणाऱ्या या कारची नोंदणी मुंबईतील ताडदेव आरटीओ ऑफिसमध्ये एस्सार ग्रुपचे सीईओ प्रशांत रुईया यांनी केली आहे.
साधरणत: 1 कोटींहून अधिक किंमतीच्या इम्पोर्टेड गाड्यांवर 20 लाखांपर्यंतचा कर आकारला जातो. मात्र टेस्ला ही पूर्णपणे विजेवर चालणारी कार असल्याने आरटीओच्या करांमधून सूट मिळाल्याचे कळते आहे.
टेस्लाची ही गाडी पूर्णपणे वीजेवर चालणारी आहे. पाच दरवाजे आणि अत्याधुनिक सुविधा असलेली ही गाडी 135 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने सुसाट चालते.
सॉफ्टवेअरमध्ये आघाडीवर असलेल्या टेस्लाच्या याच कारने जागतिक ऑटोमोबाईल इंडस्ट्रीची आणि परिणामानं जागतिक राजकारणाची सगळी गणितं बदलून टाकलीय.
विजेवर चालणाऱ्या कार जगात बहुतांश देशांत तयार होतात. अगदी भारतातही महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची e2o ( इटूओ) ही वीजेवरची गाडी आहे. पण या गाड्यांची ओळख मुख्यतः सिटी कार म्हणूनच राहिली. या गाड्यांचा वेग अत्यंत मर्यादितच आहे, आणि मुख्य म्हणजे चढावावर या गाड्या दम सोडतात. पण टेस्लाच्या या एस मॉडेलनं सगळ्या मर्यादा पार करून अमेरीकेच्या रस्त्यांवर सुसाट वेग घेतांना सगळ्याच प्रतिस्पर्ध्यांना कित्येक किलोमिटर मागे टाकलं.
शेव्हरोले, स्कोडा, वॉक्सवॅगन या दुसऱ्या कंपन्यांनी आता कंबर कसलीय. टेस्लाच्या धसक्यानं म्हणा की संशोधन अंतिम टप्प्यात आल्यानं म्हणा, शेव्हरोलेनं भारतातली आपली गाड्यांची विक्री पूर्णतः बंद केलीय. स्कोडा आणि वोक्सवॅगनही त्याच मार्गावर आहेत. अर्थात भारतात उत्पादन बंद झालेलं नाही, पण तयार होणाऱ्या गाड्या मुख्यतः लॅटीन अमेरीकन आणि अफ्रीकी देशांमध्ये निर्यात होणार असल्यानं निदान पुढची काही वर्ष तरी ते सुरूच रहाणार आहे.
टेस्लानं त्यांची ही बहुचर्चित एस मॉडेल विकण्यासाठी भारतातही सुपर डिस्ट्रीब्युटरची नेमणूकही केली आहे.
संबंधित बातमी : पेट्रोल-डिझेल नव्हे, आता पूर्णपणे विजेवर चालणारी कार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
शिक्षण
Advertisement