एक्स्प्लोर

बिल भागवण्यासाठी वेटरला ATM पिन दिला, 81000 गमावले !

मुंबई : हॉटेलमध्ये जेवण झाल्यानंतर, बिल भागवण्यासाठी तुम्ही जर तुमचं एटीएम/डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वेटरकडे देऊन, त्यालाच पिन नंबर देत असाल तर, सावधान. कारण त्याचा मोठा फटका बसू तुम्हाला शकतो. वेटरला पिन नंबर दिल्यामुळे बदलापूरच्या एका कुटुंबाला एक-दोन नव्हे तर तब्बल 81 हजार रुपयांना फटका बसला आहे. हे कुटुंब एका हॉटेलमध्ये गेलं होतं. मात्र त्यानंतर तीन दिवसांनी अज्ञाताने त्यांच्या अकाऊंटमधील तब्बल 81 हजार रुपये काढल्याचं उघड झालं आहे. हॉटेलमधील वेटरनेच काही अफरातफर केली असेल, अशी शंका या कुटुंबाने व्यक्त केली आहे. काय आहे प्रकरण? बदलापूरमधील सांगळे कुटुंब गेल्या महिन्यात 18 ऑगस्टला जेवणासाठी एका हॉटेलमध्ये गेलं होतं. कुटुंबातील 8 सदस्यांनी स्थानिक हॉटेलमध्ये जेवण केलं. जेवणानंतर वेटर 1760 रुपयांचं बिल घेऊन आला. सूर्यकांत सांगळे यांनी बिलापोटी रोख पैसे न देता त्यांचं डेबिट कार्ड दिलं. मात्र वेटरने नेटवर्कचं कारण देत, एटीएम स्वाईप करण्यासाठी काऊंटरला जावं लागेल असं सांगितलं. त्यासाठी त्याने डेबिट कार्डचा पिन नंबर मागितला. सांगळे यांनीही नंबर दिला. तीन दिवसांनी 81, 000 गायब वेटरने बिलापोटी 1760 रुपये कापून डेबिट कार्ड सांगळेंना परत आणून दिलं. मात्र तीन दिवसांनी सांगळे यांच्या अकाऊंटमधून तब्बल 81 हजार रुपये गायब झाले. सांगळे यांच्या मोबाईलवर विविध ट्रान्झॅक्शन झाल्याचे मेसेज आले. तातडीने बँकेत, पोलिसात धाव अकाऊंटमधून 81 हजार रुपये गायब झाल्याचं लक्षात येताच सांगळे यांनी त्याबाबतची कल्पना त्यांच्या मुलीला दिली. त्यांनंतर दोघांनी तातडीने कॅनरा बँकेत धाव घेतली. बँकेने त्यांना डेबिट कार्ड ब्लॉक करण्याचा आणि पोलिसात तक्रार दाखल करण्याच सल्ला दिला. यानंतर मग सांगळे यांनी स्थानिक बदलापूर ईस्ट पोलीस स्टेशनशी संपर्क साधला. बदलापूर पोलिसांनी ठाणे सायबर सेलशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांनी सायबर पोलिसात तक्रार दिली. मात्र महिनाभरानंतरही पोलीस योग्य तपास करत नसल्याचं सांगळे यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे आमचा तपास सुरु आहे असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. वेटरची चौकशी केली मात्र काहीही पुरावे नसल्याने त्याला अटक करु शकत नाही. या ट्रान्झॅक्शनसाठी जो नंबर वापरण्यात आला, तो बिहारमधील असल्याचं ट्रेस झालं, मात्र आम्ही पत्ता शोधत आहोत, असं पोलिसांनी सांगितलं. तिकडे हॉटेल मालकांनी आम्ही पोलिसांना सहकार्य करत असल्याचं सांगितलं. पोलिसांनी सीसीटीव्ही मागितलं होतं. मात्र आमच्याकडे 5 दिवसांचंच फुटेज सेव्ह असतं. त्यामुळे मागील महिन्यातील फुटेज आमच्याकडे नाही, असं हॉटेल मालकांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
Instagram Ban In India Fact Check: मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट
मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Embed widget