(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी Facebook सरसावलं, पुढील 3 वर्षात करणार लक्षणीय बदल
येत्या 3 वर्षांच्या काळात फेसबुक भारतात सीबीएसई बोर्डासोबत मिळून जवळपास 1 कोटी विद्यार्थ्यांसह 10 लाख शिक्षकांच्या डिजिटल विकासासाठी प्रयत्न करणार आहे.
नवी दिल्ली : फेसबुकने नुकतेच आपले नाव बदलून मेटा असे केले आहे. ज्यानंतर आता भारताच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण निर्णय फेसबुकने घेतला आहे. फेसबुकचा सीईओ मार्क झुकेरबर्गने फेसबुकतर्फे 'फ्युएल फॉर इंडिया 2021'मध्ये एफबी फॉर एज्यूकेशन (FB for Education) याद्वारे कंपनी सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) अर्थात सीबीएसईसोबत मिळून भारतात शैक्षणिक क्रांती घडवण्याचा प्रयत्न करणार आहे. यातून जवळपास 1 कोटीपेक्षा जास्त विद्यार्थी आणि 10 लाख शिक्षकांना डिजिटल सुरक्षा तसंच ऑनलाइन शिक्षणाबाबत माहिती देणार आहे. तसंच फेसबुकवर सीबीएसई विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक साहित्य ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्नही फेसबुकचा असणार आहे.
एफबी फॉर एज्युकेशनच्या पहिल्या टप्प्याला जून 2020 मध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांना कामाच्या भविष्यासाठी तयार करण्याच्या तसेच सुरक्षित ऑनलाइन आणि अध्ययन अनुभव देण्याच्या हेतूने सुरूवात झाली. ज्यातून जवळपास 5 लाख विद्यार्थ्यांनी डिजिटल सुरक्षा आणि ऑनलाइन तंत्रज्ञानाबाबत माहिती घेतली. तर 14 हजारपेक्षा अधिक शिक्षकांनी ऑगमेंटेड रिअलिटीच्या प्रशिक्षणासाठी नोंदणी केली. यानंतर आता पुढील 3 वर्षांसाठी दुसऱ्या टप्प्याला सुरूवात करताना निवडक मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी इंडिया इंटरनॅशनल सेंटर, नवी दिल्ली येथे एज्युकेटर्स राऊंड टेबलमध्ये 2 नोव्हेंबर 2021 रोजी सहभाग घेतला. त्यानंतर 1 डिसेंबर 2021 रोजी एका वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ५ हजारपेक्षा अधिक शिक्षकांनी डिजिटल आरोग्य, डिजिटल नागरिकत्व आणि एआर/ व्हीआरचा वापर करून विस्तारपूर्वक चर्चा केली.
ऑगमेंटेड आणि व्हर्चुअल रिअलिटीचं शिक्षण महत्त्वाचं
कोरोनाच्या संकटामुळे ऑनलाईन शिक्षण मोठ्या प्रमाणात सुरु झालं. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणामध्ये अधिक सोयी-सुविधा उपलब्ध करणंही महत्त्वाचं झालं आहे. यामध्ये ऑगमेंटेड आणि व्हर्चुअल रिअलिटी एक महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे. व्हर्चुअल रिअलिटीमध्ये शिक्षण घेताना ऑनलाईन शिक्षणही अगदी खरंखुरं वाटू लागतं. दरम्यान नॅशनल एज्युकेशन पॉलिसी (एनईपी) 2020 शी सुसंगत राहून फेसबुक आणि सीबीएसई विद्यार्थ्यांसाठी इमर्सिव्ह तंत्रज्ञान, ऑगमेंटेड रिअलिटी (एआर) आणि व्हर्चुअल रिअलिटी (व्हीआर) याबाबत अधिक शिक्षण देणार आहे.
इतर बातम्या :
- Ola Scooter : ओला स्कूटर डिलिव्हरीसाठी सज्ज! जाणून घ्या किंमत आणि मायलेज!
- Google Chrome : गुगल क्रोम वापरणाऱ्यांनो सावधान! हॅकर्सपासून वाचण्यासाठी 'या' सोप्या टीप्स फॉलो करा
- New MG Motor EV : MG Motor बाजारात आणणार नवी SUV
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha