एक्स्प्लोर

Donald Trump On Twitter : डोनाल्ड ट्रम्प ट्विटरवर परतणार नाहीत, सांगितले 'हे' कारण, म्हणाले...

Donald Trump On Twitter : मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्रम्प यांचे अकाउंट रिस्टोअर केल्यानंतर एका व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये जाहीर वक्तव्य केलंय.

Donald Trump On Twitter : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे ट्विट (Twitter) अकाउंट रिस्टोअर करण्यात आले आहे. एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरवर केलेल्या मतदानानंतर याबाबत जाहीरपणे माहिती दिली. दरम्यान, आता अशी माहिती समोर येतेय की, माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटरमध्ये रस नाही, तसेच त्यांनी ट्विटर वापरण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

डोनाल्ड ट्रम्प ट्विटरवर परतणार नाहीत
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्रम्प यांचे अकाउंट रिस्टोअर केल्यानंतर एका व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये ते म्हणाले, "माझ्याकडे ट्विटरवर परण्यासाठी कोणतेही कारण नाही. मला याचे कोणतेही कारण दिसत नाही. ट्विटर आता बॉट्स आणि बनावट खात्यांनी भरले आहे. यामुळे मला ज्या समस्यांना सामोरे जावे लागले ते अविश्वसनीय होते. यावेळी, त्यांच्या विधानात त्यांनी एलॉन मस्क यांचे देखील कौतुक केले, परंतु स्पष्टपणे सूचित केले की ते त्यांचे स्वत:चे 'ट्रुथ सोशल' वर राहतील.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या अकाऊंटवर बंदी का आली?

6 जानेवारी 2021 रोजी अमेरिकेत दंगल झाली होती. यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना देखील जबाबदार धरण्यात आले होते. या दंगलीतील त्यांच्या भूमिकेबाबत अमेरिकेत आजही चौकशी सुरू आहे. याच दरम्यान, ते आपल्या समर्थकांशी मुख्यतः ट्विटरद्वारे बोलत असे. यानंतर ट्रम्प यांना सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवरून बंदी घालण्यात आली होती. तेव्हापासून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष त्यांच्या सोशल नेटवर्किंग अॅप ट्रुथ सोशलवर सक्रिय आहेत.

''सोशल मीडिया ग्रुप 'ट्रुथ सोशल' वर राहायला आवडेल''
तब्बल 22 महिन्यांनंतर ट्रम्प यांच्या अकाऊंटवरून बंदी हटवण्यात आली आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क यांनी एक सर्वेक्षण केले होते. या दरम्यान 15 मिलीयन यूजर्सनी ट्रम्प यांचे खाते पुन्हा सक्रिय करण्यास समर्थन केले. त्या आधारावर मस्क यांनी हा निर्णय घेतला. यावेळी लोकांनी ट्विट करून म्हटले की, लोकांना ट्रम्प यांचे अकाऊंट रिस्टोअर करायचे आहे. 2021 मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूने लागला नव्हता, त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी अमेरिकेच्या कॅपिटल इमारतीवर हल्ला केला. ट्रम्प यांनी ट्विट करून या हल्लेखोरांना क्रांतिकारक म्हटले होते. त्यावेळी ज्यो बायडेन मंत्रिपदाची शपथ घेणार होते. तेव्हा ट्विटरने ट्रम्प यांच्या अकाऊंटवर बंदी घातली. यापूर्वी ही बंदी 12 तासांसाठी होती. नंतर ती अनिश्चित काळासाठी वाढली. मात्र, ट्रम्प यांनी ट्विटरवरील पुनरागमनाबद्दल आनंद व्यक्त केलेला नाही. ते म्हणाले की, त्यांना त्यांच्या सोशल मीडिया ग्रुप 'ट्रुथ सोशल' वर यायला आवडेल. त्याचवेळी त्यांनी एलॉन मस्कना एक चांगली व्यक्तीही म्हटले. लवकरच ते ट्विटरमध्ये आवश्यक ते बदल करतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

इतर महत्वाच्या बातम्या

Donald Trump Memes: डोनाल्ड ट्रम्प ट्विटरवर परतले, सोशल मीडीयावर मीम्सचा पाऊस, नेटकऱ्यांनी 'असे' केले स्वागत 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
Ajit Pawar: अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर
अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर
RBI : रिझर्व्ह बँकेची महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेवर कारवाई, सहा महिन्यांचे निर्बंध, ठेवी स्वीकारणे, कर्ज देण्यास मनाई
रिझर्व्ह बँकेची महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेवर कारवाई, सहा महिन्यांसाठी निर्बंध,

व्हिडीओ

Eknath Shinde Brother : साताऱ्यातील सावरी गावात शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ ड्रग्स सापडलं- अंधारे
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
Ajit Pawar: अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर
अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर
RBI : रिझर्व्ह बँकेची महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेवर कारवाई, सहा महिन्यांचे निर्बंध, ठेवी स्वीकारणे, कर्ज देण्यास मनाई
रिझर्व्ह बँकेची महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेवर कारवाई, सहा महिन्यांसाठी निर्बंध,
सुषमा अंधारेंकडून 145 कोटींच्या ड्रग्सचे गंभीर आरोप; प्रकाश शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, आरोप फेटाळले
सुषमा अंधारेंकडून 145 कोटींच्या ड्रग्सचे गंभीर आरोप; प्रकाश शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, आरोप फेटाळले
माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
बीड अन् धाराशिव पोलिसांची सिनेस्टाईल 'रेड'; राना-वनातून घुसल्या गाड्या, चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या
बीड अन् धाराशिव पोलिसांची सिनेस्टाईल 'रेड'; राना-वनातून घुसल्या गाड्या, चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या
Prithviraj Chavan: ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
Embed widget