भारतात लॉन्च झाली Cyborg GT120 इलेक्ट्रिक स्पोर्ट्स बाईक, रायडिंग रेंज आणि भन्नाट फीचर्ससह जाणून घ्या बरंच काही....
Ignitron Motocorp New Electric Bike : Cyborg ची इलेक्ट्रिक स्पोर्ट्स बाइक GT 120 भारतात लॉन्च झाली आहे. ही भन्नाट बाईक सिंगल चार्जमध्ये 180 किमी अंतर पार करते.
Cyborg GT 120 Launches : बाईक्सच्या दुनियेत वावरणाऱ्या तरूणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. Ignitron Motocorp ने भारतात हाय स्पीड इलेक्ट्रिक स्पोर्ट्स बाईक Cyborg GT-120 लॉन्च केली आहे. या बाईकमध्ये 4.68 kWH लिथियम-आयन बॅटरी आहे. जी 180 किमीची रेंज देते. नवीन Cyborg GT 120 तीन राइडिंग मोडसह उपलब्ध आहे. या बाईकमध्ये तुम्हाला जिओ लोकेट / जिओ फेन्सिंग, बॅटरी स्टेटस, यूएसबी चार्जिंग, ब्लूटूथ, कीलेस इग्निशन आणि डिजिटल क्लस्टर यांसारखी अनेक उत्तम फीचर्स पाहायला मिळतील. ही बाईक ब्लॅक आणि डार्क पर्पल अशा दोन कलरमध्ये उपलब्ध आहे.
2.5 सेकंदात 0 ते 40 किमी. ताशी वेग
जर आपण Cyborg GT-120 च्या पिकअपबद्दल बोललो तर कंपनी असा दावा करते की ही बाईक 2.5 सेकंदात 0 ते 40 किमी धावू शकते. प्रति तास वेग घेते. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या कोमाकी रेंजर इलेक्ट्रिक क्रूझर, रिव्हॉल्ट आरव्ही 400 आणि टॉर्क क्रॅटोस यांसारख्या इलेक्ट्रिक बाइक्सशी या बाईकची स्पर्धा होऊ शकते.
फीचर्स और स्पेसिफिकेशन
Cyborg GT 120 4.68kWhr लिथियम-आयन बॅटरी पॅकसह येते. हे ब्रशलेस डीसी मोटरशी जोडलेले आहे. ही बाईक 6kW चा पिक पॉवर जनरेट करते. Cyborg GT-120 ची रेंज एका चार्जवर 180 किमी पर्यंत आहे. ही बॅटरी 15A फास्ट होम चार्जर वापरून 5 तासांपर्यंत पूर्णपणे चार्ज केली जाऊ शकते. या बाईकच्या पुढच्या बाजूला डिस्क ब्रेकसह कॉम्बी ब्रेक सिस्टम (CBS)आणि रीजनरेटिव्ह ब्रेकिंग देण्यात आलं आहे. क्लस्टरमध्ये एक LED डिस्प्ले आहे, जो रायडरला उर्वरित बॅटरी लाइफ देखील दर्शवतो. डिस्प्लेला धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP65 रेट केले आहे.
वॉरंटी आणि किंमत
याची मोटार, बॅटरी आणि बाईकवर 5 वर्षांची वॉरंटी दिली आहे. Cyborg GT-120 या बाईकची बॅटरीसुद्धा वेदरप्रूफ आणि टच सेफ आहे. Cyborg GT 120 ची भारतातील किंमत आणि बुकिंगचे डिटेल्स पुढील महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या :
- अमेरिकेतील विमानतळावर सुरू झालेल्या 5जी सेवेचा विमानांच्या लँडिंगला अडथळा
- Apple Watch Hidden Feature : Apple 'स्मार्ट'वॉच, स्क्रिनशॉटही काढता येतो!
- 5G नेटवर्कपासून बचाव करणारे प्रोडक्ट्सच हानिकारक, योग्य माहितीशिवाय वापरणं धोकादायक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha