एक्स्प्लोर
रॅन्समवेअर अटॅक करुन जगभरात धुमाकूळ घालणाऱ्यांची निराशा
मुंबई : जगभरात सायबर हल्ला करणाऱ्यांची, 'खोदा पहाड निकला चुहा' अशीच काहीशी फसगत झाली. रॅन्समवेअर सायबल हल्ला करणाऱ्या टोळीला जगभरातून फक्त 62 हजार अमेरिकन डॉलर, म्हणजे जवळपास 43 लाख रुपयांची खंडणी गोळा करता आली आहे.
आयटी तज्ज्ञांच्या मते, ज्या प्रमाणात जगभरात सायबर हल्ला करण्यात आला त्या तुलनेत खंडणीची रक्कम अगदी नगण्य आहे. सायबर क्रिमिनल रॅन्समवेअरच्या मदतीनं कॉम्प्युटर लॉक करून त्यातला डेटा डिलीट करण्याची धमकी देतात आणि त्या बदल्यात खंडणीच्या स्वरूपात मोठी रक्कम उकळतात.
प्रत्येक व्यवहारासाठी ते 300 ते 600 अमेरिकन डॉलर्सची खंडणी मागतात. मात्र सायबर क्रिमिनलचा डाव फसल्यामुळं ते भविष्यात मोठा सायबर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गेल्या शुक्रवारपासून रॅन्समवेअर सायबल हल्ल्याची मालिका सुरु आहे. यात बँका, रुग्णालये, खाजगी आणि सरकारी कार्यालयांना लक्ष्य करण्यात आलं आहे. हल्लेखोरांनी मायक्रोसॉफ्टची जुनी ऑपरेटिंग सिस्टम ओएसच्या कमकुवतपणाचा फायदा घेतला.
तर सोमवारी कामाचा दिवस सुरु झाल्यानंतर जगभरात जवळपास दोन लाख कंपन्या आणि नागरिकांवर सायबर हल्ला झाला. या सायबर हल्ल्यामुळे सध्या संपूर्ण जगात गोंधळ निर्माण झाला असून, रॅन्समवेअर व्हायरस नष्ट करण्यासाठी आयटी तज्ज्ञांचे प्रयत्न सुरु आहेत.
रॅनसमवेअरपासून बचाव कसा कराल?
- तुम्हाला एखाद्या अनोळखी, व्यक्तीचा किंवा कंपनीचा ई-मेल आला असेल, तर तो ओपन करु नका
- ई-मेल करणारा व्यक्ती ओळखीचा आहे, मात्र ई-मेलचा विषय दररोजपेक्षा वेगळा किंवा तुमच्या कामाशी मिळता जुळता, विस्कळीत असेल तरीही तो ई-मेल ओपन करु नये.
- जी-मेल, याहू, हॉटमेल आणि रेडिफमेलवर तुमचे वैयक्तीक मेल ओपन करणं टाळावं.
- पेन ड्राईव्ह, पर्सनल पेन ड्राईव्ह किंवा कंपनीच्या एक्स्टर्नल हार्ड डिस्कचा वापर टाळावा.
- ई-कॉमर्स वेबसाईटवरुन खरेदी करताना सावधानता बाळगा
- फेसबुक, लिंकडेन आणि ट्विटरचा वापर कमीत कमी करुन अनोळखी जाहिराती किंवा मेसेज ओपन करु नये.
- तुमची सिस्टम हॅक झाल्याचा संशय आला, किंवा काही एरर मेसेज आल्यास तातडीने आयटी टीमशी संपर्क साधा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement