News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

'फादर्स डे'ला मुलासोबत फायनल, सेहवागचं हटके ट्विट

FOLLOW US: 
Share:
मुंबई: विराट कोहलीच्या टीम इंडियानं बर्मिंगहॅमच्या उपांत्य सामन्यात बांगलादेशचा नऊ विकेट्सनी धुव्वा उडवून फायनलमध्ये धडक मारली. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला 50 षटकांत सात बाद 264 धावांत रोखून टीम इंडियाची निम्मी मोहीम फत्ते केली होती. मग रोहित शर्माच्या नाबाद शतकानं भारताचा विजय आणखी सोपा केला. रोहितनं शिखर धवनच्या साथीनं 87 धावांची दमदार सलामी दिली. मग त्यानं आणि विराट कोहलीनं दुसऱ्या विकेटसाठी 178 धावांची अभेद्य भागीदारी रचून टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. वीरेंद्र सेहवागचं ट्विट या विजयानंतर टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने त्याच्याच स्टाईलमध्ये हटके ट्विट केलं. सेहवागने आपल्या ट्विटमधून पाकिस्तानवर निशाणा साधला. सेहवाग म्हणतो, "नातवांनी, चांगला प्रयत्न केला. सेमीफायनलपर्यंत पोहोचण्यासाठीचा प्रयत्न चांगला होता. घरातलीच गोष्ट आहे. फादर्स डेला मुलासोबत फायनल मॅच आहे. हा विनोद आहे, सिरियस होऊ नका. https://twitter.com/virendersehwag/status/875385485140426752 इंग्लंडला हरवून पाकिस्तान फायनलमध्ये यापूर्वी पाकिस्तानने इंग्लंडला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. त्यामुळे येत्या रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान असा अंतिम सामना रंगणार आहे.  दहा वर्षांनी दोन्ही संघ फायनलमध्ये आमने-सामने भारत आणि पाकिस्तान हे संघ जवळपास 10 वर्षांनी आयसीसी स्पर्धेत एकमेकांविरोधात फायनलमध्ये पोहोचले आहेत. यापूर्वी 2007 मध्ये टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात फायनल रंगली होती. त्यावेळी धोनीच्या नेतृत्त्वातील भारतीय संघाने पाकिस्तानला हरवून विश्वचषकावर नाव कोरलं होतं. संबंधित बातम्या रविवारी ड्रीम फायनल, बांगलादेशला धूळ चारत टीम इंडियाची फायनलमध्ये धडक! पाकिस्तानविरुद्धचा सामना इतर सामन्यांप्रमाणेच : विराट कोहली 8 हजार धावांचा टप्पा ओलांडणारा कोहली सर्वात वेगवान फलंदाज वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
Published at : 16 Jun 2017 10:45 AM (IST) Tags: Cricket news in Marathi champion trophy fixtures champions trophy schedule 2017 champions trophy schedule champions trophy matches champions trophy 2017 champions trophy virender sehwag bangladesh Marathi News abp majha India

आणखी महत्वाच्या बातम्या

मोठी बातमी! आता नव्या सिमकार्ड खरेदीसाठी नियम बदलला, 'ही' चूक केली तर होणार कठोर कारवाई

मोठी बातमी! आता नव्या सिमकार्ड खरेदीसाठी नियम बदलला, 'ही' चूक केली तर होणार कठोर कारवाई

सोशल मीडिया वयाची 18 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी, आई वडिलांची परवानगी आवश्यक, DPR वर लवकरच अंतिम निर्णय

सोशल मीडिया वयाची 18 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी, आई वडिलांची परवानगी आवश्यक, DPR वर लवकरच अंतिम निर्णय

अवघ्या 10 मिनिटांत पोहोचणार रुग्णवाहिका, Blinkit ची नवीन सेवा

अवघ्या 10 मिनिटांत पोहोचणार रुग्णवाहिका, Blinkit ची नवीन सेवा

महाराष्ट्रात क्रांती, पहिले AI धोरण जाहीर होणार; मंत्री आशिष शेलार यांनी घेतला आढावा, दिले महत्त्वाचे निर्देश

महाराष्ट्रात क्रांती, पहिले AI धोरण जाहीर होणार; मंत्री आशिष शेलार यांनी घेतला आढावा, दिले महत्त्वाचे निर्देश

WhatsApp Update : व्हॉट्सॲप आता 'या' स्मार्टफोन्सवर चालणार नाही, बघा तुमचा फोनही यादीत आहे का?

WhatsApp Update : व्हॉट्सॲप आता 'या' स्मार्टफोन्सवर चालणार नाही, बघा तुमचा फोनही यादीत आहे का?

टॉप न्यूज़

Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ

Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक

EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?

EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?

गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..

गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..