एक्स्प्लोर

मोठी बातमी, आता व्हाटसॲप, टेलीग्राम, स्नॅपचॅटचा वापर करण्यासाठी सिम कार्ड आवश्यक,अन्यथा ॲप बंद होणार  केंद्रानं नवे नियम बनवले, अंमलबजावणी कधी? 

New Rules : सिमकार्ड बाइंडिंग नियम आता मेसेजिंग ॲप्सवर देखील लागू होणार आहे. आतापर्यंत हा नियम बँकिंग आणि यूपीआय ॲप साठी लागू होता. 

नवी दिल्ली : भारत सरकारनं मेसेजिंग ॲप्सच्या वापरासंदर्भात नियम तयार केला आहे. त्या नियमानुसार देशातील कोट्यवधी यूजर्ससाठी ॲप वापरण्याची पद्धत बदलावी लागू शकते. नव्या नियमानुसार व्हाटसॲप, टेलीग्राम, सिग्नल, स्नॅपचॅट, शेअरचॅट, जिओ चॅट,अरटटाई आणि जोश सारखी ॲप सिमकार्ड सुरु असल्याशिवाय सुरु राहू शकणार नाहीत.दूरसंचार विभागानं हे नियम टेलीकम्युनिकेशन सायबर सिक्युरिटी अमेंडमेंट रुल्स 2025 नुसार लागू केले आहेत. 

देशात पहिल्यांदा ॲप आधारित मेसेजिंग प्लॅटफॉर्मला टेलीकॉम सारख्या कठोर नियमावलीत आणलं गेलं आहे. नवा सिम बायंडिंग नियम या ॲपवर देखील लागू असेल. ही व्यवस्था यापूर्वी बँकिंग आणि यूपीआय  ॲप साठी लागू होती. त्यामुळं सिमकार्ड सुरु नसेल तर लॉगीन होत नाही. 

सरकारनं या ॲप्सला टेलिकम्युनिकेशन आयडेंटिफायर यूजर एनटिटी श्रेणीत ठेवलं आहे. आता या प्लॅटफॉर्म्सला हे निश्चित करावं लागेल की ॲप यूजरचं सिम कार्ड सोबत नेहमी संलग्न  असावं. ही व्यवस्था 90 दिवसांमध्ये लागू करावी लागेल. 

वेब ब्राऊजर वापरणाऱ्यांसाठी देखील मोठा बदल करण्यात आला आहे. त्यानुसार  प्रत्येक 6 तासानंतर ऑटो लॉगआऊट होईल. त्यानंतर क्यूआर कोड स्कॅन करुन लॉगीन करता येईल. 

सरकारच्या मते गुन्हेगारांना खोटी खाती चालवणं यामुलं अडचणीचं होईल. कारणं प्रत्येक वेळी सक्रिय आणि पडताळणी केलेलं सिमकार्ड आवश्यक होईल.

दूरसंचार विभागाच्या मते बहुतांश मेसेजिंग ॲप्स पहिल्यांदा इन्स्टॉल करताना मोबाईल क्रमांकाची पडताळणी करतात. त्यानंतर सिमकार्ड हटवलं तरी ते सुरु राहतं. सेल्यूलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियानं यामुळं सुरक्षेतील मोठी त्रुटी निर्माण होते. याचा फायदा घेत सायबर गुन्हेगार सिमकार्ड बदलल्यानंतर किंवा बंद केल्यानंतर देखील ॲपचा वापर सुरु ठेवतात. त्यांचं लोकेशन, कॉल रेकॉर्ड आणि कॅरिअर डाटा ट्रेस होत नव्हता. 

सायबरतज्ज्ञांच्या मते यामुळं फसवणूक आणि स्पॅम कमी होतील. यामुळं यूजर , नंबर आणि डिव्हाईस ट्रेसिंग सोपी होईल. मात्र, काही जाणकारांच्या मते गुन्हेगार खोट्या कागदपत्रांच्या  द्वारे किंवा कागदपत्रांचा गैरवापर करुन सिमकार्ड घेऊ शकतात. मात्र, टेलिकॉम उद्योगाच्या मते भारतात मोबाईल क्रमांक ही सर्वात मजबूत डिजीटल ओळख आहे. या नियमामुळं सायबर सुरक्षा आणखी मजबूत होईल. 

दरम्यान, कोट्यवधी भारतीयांना त्यांच्या दररोजच्या डिजीटल सवयी बदलाव्या लागतील. कारण आता यूजर्स सहा तासांपेक्षा अधिक काळ व्हाटसॲप वेब सुरु ठेवू शकणार नाहीत. त्यांना सहा तासांनंतर लॉगीन करावं लागेल. जर सिम कार्ड बंद झालं असेल किंवा स्लॉटमध्ये नसेल तर अॅप बंद राहतील. 

महत्त्वाच्या बातम्या

Death Certificate New Rules : मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
Satara Bus Accident : कास पठारावरुन परत येताना यवतेश्वर घाटात सोलापूरच्या बसचा ब्रेक फेल, चालकाच्या प्रसंगावधान राखल्यानं 32 प्रवाशांचा जीव बचावला
कास पठारावरुन परत येताना यवतेश्वर घाटात बसचा ब्रेक फेल, चालकाच्या दक्षतेमुळं 32 प्रवाशांचा जीव वाचला
Shubman Gill : चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन
चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन
Diwali Chhath Special Trains : छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन

व्हिडीओ

Mumbai Gas Leakage : गॅसगळती जीवावर, सुरक्षा वाऱ्यावर, रडारवर महापालिकेचे अधिकारी | Special Report ABP Majha
Urban Naxal News : शहरी नक्षलवादाची कहाणी, शरणागत नक्षलीची जुबानी | Special Report ABP Majha
Maharashtra Dushkal GR : राज्यात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरकारच्या GR मध्ये काय?
Gadchiroli Flood : छत्तीसगडचा पाऊस, गडचिरोलीत हाहाकार Special Report
Manoj Jarange Patil : व्यासपीठ काढलं, मंडप हटवला... पण आंदोलन सुरुच | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Death Certificate New Rules : मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
Satara Bus Accident : कास पठारावरुन परत येताना यवतेश्वर घाटात सोलापूरच्या बसचा ब्रेक फेल, चालकाच्या प्रसंगावधान राखल्यानं 32 प्रवाशांचा जीव बचावला
कास पठारावरुन परत येताना यवतेश्वर घाटात बसचा ब्रेक फेल, चालकाच्या दक्षतेमुळं 32 प्रवाशांचा जीव वाचला
Shubman Gill : चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन
चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन
Diwali Chhath Special Trains : छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
Election : अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, कट्टर राजकीय विरोधक विखे - थोरात एकत्र,गुप्त बैठकीत  निवडणूक बिनविरोध करण्यासाठी खलबतं
अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी कट्टर राजकीय विरोधक विखे - थोरात एकत्र, संगमनेरमध्ये गुप्त बैठकीत खलबतं
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
AC TV Price Hike : ग्राहकांना मोठा धक्का, 1 ऑक्टोबरपासून एसी, टीव्ही आणि वॉशिंग मशीनचे दर वाढणार, 2026 मध्ये तिसऱ्यांदा महागाईचा चटका 
1 ऑक्टोबरपासून AC, TV सह वॉशिंग मशीन महागणार,ग्राहकांना वर्षभरात तिसऱ्यांदा महागाईचा धक्का 
Solapur Drought: डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
Embed widget