एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Sarahah अॅपवर आता तुमची ओळख गुप्त राहणार नाही?

sarahahexposed या नावाच्या एका वेबसाइटनं दावा केला आहे की Sarahahवर मेसेज करणाऱ्या यूजर्सची माहिती यापुढे तुम्हाला मिळेल.

  मुंबई : सोशल मीडियावर Sarahah या अॅपनं गेल्या काही दिवसांपासून बराच धुमाकूळ घातला आहे. फेसबुकवर हे अॅप बरंच व्हायरल झालं आहे. Sarahahवर तुम्ही तुमच्या मनातील गोष्ट लिहू शकता आणि तुमची ओळखही लपवू शकतात. Sarahahवर तुमच्याबाबत कोणीही लिहू शकतं. पण नेमकं कोण लिहतंय हे समजू शकत नाही. आपल्याबद्दल नेमकं कोण लिहतंय याची आपल्याला बरीच उत्सुकता असते. यूजर्सची ही उत्सुकता लक्षात घेता sarahahexposed या नावाच्या एका वेबसाइटनं दावा केला आहे की Sarahahवर मेसेज करणाऱ्या यूजर्सची माहिती यापुढे तुम्हाला मिळेल. s9 sarahahexposedनं केलेला दावा खरा आहे की खोटा हे तपासण्यासाठी आम्ही या वेबसाइटवर गेलो. तेव्हा याचं लेआऊट अगदी Sarahah सारखंच असल्याचं दिसून आलं. यावेळी पेजवर काही लोकांचे लाईव्ह कमेंट दिसत होते. या पेजवर तुम्हाला बोल्ड अक्षरात Enter Name ऑप्शन पाहायला मिळेल. पण तुम्ही जेव्हा तुमचं Sarahahचं यूजर नेम टाकाल तेव्हा तुम्हाला काहीही दिसणार नाही. त्यामुळे sarahahexposedचा दावा खोटा असल्याचं समजतं. ही वेबसाइट क्लिक मिळवून पैसे कमावत आहे. तर तुम्हाला असा कोणताही मेसेज मिळाला असेल तर यावर क्लिक करु नका. Sarahah अॅपचा दावा आहे की तुमचा डेटा एनक्रिप्टेड आहे जो डिकोड करता येणार नाही. या अॅपमध्ये मेसेज नेमकं कोण पाठवतं हे समोर येत नाही. आतापर्यंत कोणतंही वेब प्लॅटफॉर्म Sarahahची डेटा सुरक्षा मोडू शकलेलं नाही. Sarahah वर अकाऊण्ट कसं ओपन कराल? गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल स्टोअरवरुन तुम्ही Sarahah अॅप डाऊनलोड करु शकता. iOS फाइल 22 एमबी, तर अँड्रॉईड फाईल 12 एमबीची आहे. अॅप डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही साईन इन करा. तुमच्या अकाऊंटची मेसेज लिंक फेसबुक अकाऊंटवर शेअर करा. यानंतर तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही. तुमचे मित्र तुम्हाला मेसेज पाठवत जातील. मात्र मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचं नाव तुम्हाला समजणार नाही, हीच या अॅपची गंमत आहे. संबंधित मेसेजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज बॉक्स दिसेल. त्यावर तुम्ही तुमचं उत्तर लिहून पाठवू शकता. सौदी अरेबियातील जेन अबीदिन तौफिकने हे अॅप तयार केलं आहे. हे सोशल मीडिया अॅप असून जुलै 2017 मध्ये लेटेस्ट अपडेट करण्यात आलं आहे. Sarahah चे साइड-इफेक्ट काय आहेत? मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळख गुप्त राहणार असल्यामुळे कोणतीही व्यक्ती कोणालाही कशाही प्रकारचा मेसेज पाठवू शकते. यामध्ये शिवराळ किंवा अश्लील मेसेजचाही समावेश होतो. तुम्हाला मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटणार नसल्यामुळे त्याचा गैरवापर होण्याची भीती आहे. अर्थातच अशा मेसेजविरोधात सायबर क्राईमकडे तक्रार करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. संबंधित बातम्या : काय आहे Sarahah अॅप? तुमची ओळख गुप्त कशी राहते?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shani Amavasya : एकनाथ शिंदेंनी ऐन अमावस्येला गावात पाऊल ठेवलं; तिकडे अशी कोणती देवी? संजय राऊतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
ऐन अमावस्येला नाराज एकनाथ शिंदे गावाला; तिकडे अशी कोणती देवी? संजय राऊत म्हणतात...
काँग्रेसचा विधानसभेत लाजीरवाणा पराभव, मल्लिकार्जुन खरगेंनी राहुल गांधींसमोरच नेत्यांना खडसावलं
काँग्रेसचा विधानसभेत लाजीरवाणा पराभव, मल्लिकार्जुन खरगेंनी राहुल गांधींसमोरच नेत्यांना खडसावलं
Ranbir Kapoor : पाकिस्तानी माहीरा, दीपिका ते श्रुती हसन! आलिया भट्टला भेटण्यापूर्वी रणबीर कपूरची 'या' 11 अभिनेत्रींसोबत अफेअरची मालिकाच झाली
पाकिस्तानी माहीरा, दीपिका ते श्रुती हसन! आलिया भट्टला भेटण्यापूर्वी रणबीर कपूरची 'या' 11 अभिनेत्रींसोबत अफेअरची मालिकाच झाली
Bollywood Interfaith Marriages : रितेश देशमुख, धर्मेंद्र ते सुनील शेट्टी! बॉलीवूडमधील 13 आंतरधर्मीय विवाह माहीत आहेत का?
रितेश देशमुख, धर्मेंद्र ते सुनील शेट्टी! बॉलीवूडमधील 13 आंतरधर्मीय विवाह माहीत आहेत का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 30 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaSanjay Raut Full PC : शिंदेंच्या चेहऱ्यावरचं हास्य मावळलंय; ते काय करतील सांगता येत नाहीSanjay Shirsat PC | महायुतीची मीटिंग सोडून शिंदे गावी, संजय शिरसाटांनी दिली महत्वाची माहितीABP Majha Headlines :  11 AM : 30 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shani Amavasya : एकनाथ शिंदेंनी ऐन अमावस्येला गावात पाऊल ठेवलं; तिकडे अशी कोणती देवी? संजय राऊतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
ऐन अमावस्येला नाराज एकनाथ शिंदे गावाला; तिकडे अशी कोणती देवी? संजय राऊत म्हणतात...
काँग्रेसचा विधानसभेत लाजीरवाणा पराभव, मल्लिकार्जुन खरगेंनी राहुल गांधींसमोरच नेत्यांना खडसावलं
काँग्रेसचा विधानसभेत लाजीरवाणा पराभव, मल्लिकार्जुन खरगेंनी राहुल गांधींसमोरच नेत्यांना खडसावलं
Ranbir Kapoor : पाकिस्तानी माहीरा, दीपिका ते श्रुती हसन! आलिया भट्टला भेटण्यापूर्वी रणबीर कपूरची 'या' 11 अभिनेत्रींसोबत अफेअरची मालिकाच झाली
पाकिस्तानी माहीरा, दीपिका ते श्रुती हसन! आलिया भट्टला भेटण्यापूर्वी रणबीर कपूरची 'या' 11 अभिनेत्रींसोबत अफेअरची मालिकाच झाली
Bollywood Interfaith Marriages : रितेश देशमुख, धर्मेंद्र ते सुनील शेट्टी! बॉलीवूडमधील 13 आंतरधर्मीय विवाह माहीत आहेत का?
रितेश देशमुख, धर्मेंद्र ते सुनील शेट्टी! बॉलीवूडमधील 13 आंतरधर्मीय विवाह माहीत आहेत का?
Sanjay Raut on Eknath Shinde : शिंदेंचा चेहरा पडलाय, डोळ्यात चमक नाही, नाराज होऊन अमावस्येच्या मुहूर्तावर गावाला; संजय राऊतांचा बोचरा वार
शिंदेंचा चेहरा पडलाय, डोळ्यात चमक नाही, नाराज होऊन अमावस्येच्या मुहूर्तावर गावाला; संजय राऊतांचा बोचरा वार
Eknath Shinde in Village: एकनाथ शिंदे अचानक दरे गावात का गेले? आदित्य ठाकरे आकाशाकडे पाहत म्हणाले, चंद्र दिसतोय का?
एकनाथ शिंदे अचानक दरे गावात जाण्याचं कारण काय? आदित्य ठाकरे म्हणाले, आकाशात चंद्र दिसतोय का?
Nashik Cold Wave : भयंकर थंडीने नाशिक गारठलं, निफाड, ओझरमध्ये हाडं गोठवणारी थंडी, गोदावरी नदीवर धुक्याची चादर
भयंकर थंडीने नाशिक गारठलं, निफाड, ओझरमध्ये हाडं गोठवणारी थंडी, गोदावरी नदीवर धुक्याची चादर
Mohammed Shami : टीम इंडियाचा वाघ पुन्हा एकदा जखमी! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये खेळण्याच्या आशा मावळल्या? फोटो व्हायरल
टीम इंडियाचा वाघ पुन्हा एकदा जखमी! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये खेळण्याच्या आशा मावळल्या? फोटो व्हायरल
Embed widget