(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Avoid WhatsApp Delta : सावधान! तुम्ही 'ही' चूक करताय? तर तुमचंही WhatsApp अकाऊंट होईल ब्लॉक
Avoid WhatsApp Delta : नव्या फिचर्ससाठी युजर्स WhatsApp सारख्या दुसऱ्या डुप्लिकेट अॅपचा वापर करतात. तुम्हीही WhatsApp Delta वापरताय, तर तुमचंही व्हॉट्सअॅप अकाऊंट ब्लॉक होऊ शकतं.
Avoid WhatsApp Delta : नव्या फिचर्ससाठी युजर्स व्हॉट्सअॅप (WhatsApp) सारख्या दुसऱ्या डुप्लिकेट अॅपचा वापर करतात. तुम्हीही व्हॉट्सअॅप डेल्टा (WhatsApp Delta) वापरताय, तर तुमचंही व्हॉट्सअॅप अकाऊंट ब्लॉक होऊ शकतं.
Avoid WhatsApp Delta : मेसेजिंग अॅपबाबत जर चर्चा होत असेल, तर व्हॉट्सअॅपचं नाव सर्वात आधी घेतलं जातं. व्हॉट्सअॅप जगात सर्वात जास्त इन्स्टॉल केलेल्या अॅपपैकी एक आहे. मेटा (Meta) ची मालकी असलेली ही कंपनी युजर्ससाठी वेळोवेळी नवनवीन फीचर्स उपलब्ध करुन देत असते. मात्र, तरीही युजर्स अधिक आणि नव्या फिचर्ससाठी व्हॉट्सअॅपची नक्कल करणाऱ्या दुसऱ्या अॅपचा वापर करतात. यासारखाच एक अॅप म्हणजे व्हॉट्सअॅप डेल्टा सध्या चर्चेत आहे. या अॅपमधील काही नवीन आणि वेगळ्या फिचर्समुळे अनेक युजर्स या अॅपचा मोठ्या प्रमाणात वापर करत असल्याचं दिसून येतंय. जर तुम्हीही व्हॉट्सअॅप डेल्टा अॅप वापरत असाल, तर तुम्हांलाही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. या डुप्लिकेट अॅपमुळे तुमचं व्हॉट्सअॅप अकाऊंट ब्लॉक होऊ शकतं. व्हॉट्सअॅप डेल्टा काय आहे आणि त्यामुळे तुमचं व्हॉट्सअॅप कसं ब्लॉक होऊ शकतं, जाणून घ्या....
व्हॉट्सअॅप डेल्टा काय आहे?
आतापर्यंत अनेक अॅप डेव्हलपर्सनी व्हॉट्सअॅपची नक्कल करत व्हॉट्सअॅपची वेगळी आवृत्ती ( Version) बनवलीय. व्हॉट्सअॅप डेल्टा किंवा जीबी व्हॉट्सअॅप (GB WhatsApp) असाच अॅप आहेत. हा अॅप डेल्टाबेस स्टुडिओनं तयार केलंय. या अॅपमध्ये तुम्हांला कस्टमायझेशनचे पर्याय मिळतात. यामध्ये तुम्ही प्रायमरी कलर, एक्सेंट कलर, ऐप्लिकेशन थीम, कस्टम फॉन्ट स्टाइल होम यूआई, मेसेज यूआई यासारखे फिचर्स उपलब्ध आहेत. याशिवाय, तुम्हांला ऑटो रिप्लाई, थर्ड पाटी व्हिडीओ प्लेयर, ऑनलाईन स्टेटस हाईड, टाइपिंग नोटीफिकेशन आणि डु नॉट डिस्टर्ब यासारखे फिचर्सही मिळतात. तसेच या अॅपमध्ये तुम्हांला मोठ्या फाईल्सही पाठवता येतात. या अॅपमधील सर्वात महत्त्वाचा फिचर म्हणजे तुम्ही एकदा पाठवलेल्या मेसेजमध्ये बदल करु शकता. या अॅपमध्ये जर तुम्ही कोणलाही मेसेज पाठवला असेल, तर तो मेसेज तुम्हांला डिलीट करता येतो आणि तो मेसेज पाठवलेल्या व्यक्तीच्या स्क्रिनवरही अपडेट होतो. या वेगळ्या फिचरमुळेच व्हॉट्सअॅप डेल्टा किंवा जीबी व्हॉट्सअॅप युजर्सच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.
व्हॉट्सअॅपनं दिली चेतावणी?
यासारखे अॅप मूळ (Original) अॅपची नक्कल (Duplicate) असल्याने गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध नसतात. हे अॅप ऑनलाईन APK द्वारे डाऊनलोड करावे लागतात. या अॅपच्या वाढत्या वापरामुळे व्हॉट्सअॅपनं आपल्या यूजर्सला चेतावणी दिली आहे. व्हॉट्सअॅपकडून डुप्लिकेट अॅपचा वापर करत असलेल्या युजरचं अकाऊंट ब्लॉक करण्यात येईल.
हे ही वाचा :
Sweden First Female PM : स्वीडनच्या पहिल्या महिला पंतप्रधानांचा नियुक्तीनंतर काही तासांनी राजीनामा, नक्की काय घडलं?
आर्क्टिक समुद्रात 'ट्रॅफिक जाम'; 11 इंच बर्फात अडकले 24 जहाज, रशियाला झटका
Vodafone Idea New Tariff : एअरटेलनंतर व्हीआयचाही रिचार्ज महागला, जाणून घ्या व्हीआयचे नवे प्लॅन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha