WhatsApp, Telegram : सतत व्हॉट्स-अप अन् टेलिग्रामवरील मेसेजचे नोटिफिकेशन येतात? करा हे सेटिंग
मोबाईलमध्ये येणाऱ्या व्हॉट्स-अॅप आणि टेलिग्रामच्या मेसेजचे नोटिफिकेशन बंद करण्यासाठी सोप्या सेटिंगचा वापर तुम्ही करू शकता.
![WhatsApp, Telegram : सतत व्हॉट्स-अप अन् टेलिग्रामवरील मेसेजचे नोटिफिकेशन येतात? करा हे सेटिंग android phone tips tricks how to mute conversations on whatsapp telegram WhatsApp, Telegram : सतत व्हॉट्स-अप अन् टेलिग्रामवरील मेसेजचे नोटिफिकेशन येतात? करा हे सेटिंग](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/05/47263f37304f4fdef4a6cd93e063becc_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
WhatsApp, Telegram : सध्या अनेक जण वेगवेगळ्या सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफोर्मचा वापर करतात. सोशल मीडियावर आपण वेगवेगळ्या पोस्ट देखील शेअर करतो. सध्या व्हॉट्स-अॅप, फेसबुक मेसेंजर आणि टेलिग्राम या सोशल मीडिया प्लॅटफोर्मचा वापर लोकांसोबत संपर्क साधण्यासाठी देखील अनेक जण करतात. अनेक वेळा वेगवेगळ्या ग्रुपमध्ये लोक तुम्हाला अॅड करतात. या ग्रुपमधील मेंबर्स अनेक फॉरवर्ड मेसेज सेंड करत असतात. हे मेसेज आल्यानं तुमच्या मोबाईलची मेमरी जास्त होऊ शकते. मोबाईलमध्ये येणाऱ्या व्हॉट्स-अॅप आणि टेलिग्रामच्या मेसेजचे नोटिफिकेशन बंद करण्यासाठी सोप्या सेटिंगचा वापर तुम्ही करू शकता. त्यामुळे सतत येणारे नोटिफिकेशन बंद होती.
व्हॉट्स-अप चॅट बंद करण्याची सोपी पद्धत-
व्हॉट्स-अॅप सुरू करून त्यामधील चॅट्स ओपन करा.
एखाद्या ग्रुपमधील येणाऱ्या मेसेजचे नोटिफिकेशन बंद करण्यासाठी त्या ग्रुपच्या चॅटवर लाँग प्रेस करा.
त्यानंतर तुम्हाला काही ऑप्शन्स दिसतील त्या ऑप्शनमधील म्यूट हे आयकॉन सिलेक्ट करा.
म्यूट ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर एक नोटिफिकेशन येईल. त्यामध्ये तुम्ही या चॅटमधील मेसेजचे नोटिफिकेशन किती वेळ म्यूट करायचे आहे ते सिलेक्ट करू शकता.
टेलिग्रामवरील चॅट म्यूट करण्याची सोपी पद्धत
टेलिग्रॅम अॅप ओपन करा.
ज्या ग्रुपचे मेसेज म्यूट करायचे आहे त्या ग्रुपच्या चॅटवर लाँग प्रेस करा.
त्यानंतर तुम्हाला एक नोटिफिकेशन दिसेल. यावर हे चॅट किती वेळासाठी म्यूट करायचे आहे ते ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर "Desable" हा ऑप्शन सिलेक्ट करा.
महत्वाच्या बातम्या :
- Samsung Galaxy : 5 कॅमेऱ्यांसह उपलब्ध असलेला सॅमसंगचा A73 5G स्मार्टफोन लवकरच भारतात लॉन्च, किंमत माहितीये?
- Whats App : भारतातील 14 लाखांहून अधिक युजर्सचे Whats App अकाउंट बंद
- वनप्लसचा भारतातील सर्वात महागडा स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या फोनबाबतच्या 11 गोष्टी!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)