एक्स्प्लोर
Advertisement
अमेझॉन प्राईम भारतात लाँच, अमेझॉन व्हिडिओही लवकरच
मुंबई: ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अमेझॉननं आपलं प्राइम सब्सक्रिप्शन भारतात लाँच केलं आहे. यूजर्स अमेझॉन प्राइमसाठी अमेझॉन इंडियाची वेबसाइट साइन अप करु शकतात. जर तुम्ही आता साइन अप केलं तर यूर्जसला 60 दिवसांपर्यंत मोफत ट्रायल मिळेल. त्यानंतर ही सेवा मिळविण्यासाठी तुम्हाला दरवर्षासाठी 499 रु. द्यावे लागतील. तसं भारतात यासाठी 999 रु. दरवर्षी आहेत. मात्र, लाँच किंमत कधीपर्यंत वैध आहे याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.
भारतात अमेझॉन प्राइम सब्सक्रिप्शनवर मिळणाऱ्या सेवेबाबत तुम्ही थोडे निराश होऊ शकतात. सध्या प्राइम सब्सक्रिप्शनसोबत यूजर्सला अनलिमिटेड एक दिवस किंवा दोन दिवस डिलिव्हरी ऑफर मिळेल.
याशिवाय अमेझॉनवरील काही ऑफर सगळ्यात आधी प्राइम सब्सक्रिप्शन यूजर्सला उपलब्ध करुन दिली जाईल. अमेरिकेच्या प्राइम यूजर्सला दिेल्या जाणाऱ्या अमेझॉन व्हिडिओ आणि अमेझॉन म्युझिक सेवाही भारतात सध्या देण्यात आलेल्या नाही. दरम्यान, अमेझॉन व्हिडिओ ही सेवा भारतात लवकरच लाँच करण्यात येणार असल्याचं कंपनीनं स्पष्ट केलं.
अमेरिकेत अमेझॉन प्राइमची किंमत ९९ डॉलर (जवळजवळ 6700 रु.) प्रतिवर्षी आहे. अमेरिकन यूजर्सला लाखो ई-बुक, मोफत अनलिमिटेड स्टोरज, म्युझिक आणि व्हिडिओ एक्सेस मिळतो.
प्राइम यूजर्सला प्रत्येक प्रोडक्ट हे मोफत डिलिव्हरी मिळणार नाही. ही ऑफर फक्त प्राइम चेकमार्कसाठी असणार आहे.
अमेझॉन प्राइम सेवेचा फायदा देशभरातील २० शहरामध्ये घेता येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement