एक्स्प्लोर
Advertisement
रिलायन्स जिओ 4G बाबत सर्व काही एकाच क्लिकवर
मुंबई : रिलायन्सची बहुप्रतीक्षित जिओ 4G सेवा अखेर लाँच झाली आहे. जिओ सिम खरेदी करणाऱ्या ग्राहकांना डिसेंबरपर्यंत एसटीडी कॉल्स आणि डाटा सेवा मोफत देण्यात येईल, अशी घोषणाही यावेळी रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी केली आहे. लाँचिंगसोबत सिम खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अंबानी यांनी मोठं गिफ्ट दिलं आहे.
काय काय आहेत रिलायन्स जिओच्या ऑफर्स :
19 रुपयांत एका दिवसाचं इंटरनेट (किती डेटा मिळणार याचा उल्लेख नाही)
999 रुपयात 10 GB डेटा - रात्री अनलिमिटेड 4G
1499 रुपयात 20 GB डेटा- रात्री अनलिमिटिड 4G
2499 रुपयात 35 GB डेटा- रात्री अनलिमिटिड 4G
3999 रुपयात 60 GB डेटा- रात्री अनलिमिटिड 4G
4999 रुपयात 75 GB डेटा- रात्री अनलिमिटिड 4G
रिलायन्स जिओ 4G च्या प्लानवर एक नजर
- 5 सप्टेंबर रोजी लाँचिंग
- आयुष्यभरासाठी आऊटगोईंग कॉलिंग फ्री, STD, लोकल कॉल लाईफटाईम फ्री
- डिसेंबरपर्यंत डेटा मोफत, त्यानंतर केवळ 50 रुपयात 1GB 4G डेटा
- आयुष्यभरासाठी रोमिंग फ्री
- डेटाच्या दरात कॉलिंग फ्री, फक्त इंटरनेट डेटाचे पैसा भरावे लागणार
- 18,000 शहरं आणि 2 लाख गांवांपर्यंत जिओची सुविधा
- मार्च 2017 पर्यंत 90 टक्के जनतेपर्यंत जिओ पोहचवण्याचा मानस
- विद्यार्थ्यांसाठी 25 टक्के वाढीव डेटा
- 30 हजार शाळांमध्ये मोफत वायफाय
- जिओ जगातील सर्वात स्वस्त डेटा देणार
- ब्लॅकआऊट डे नाही म्हणजे सण, उत्सवाला SMS, कॉल दर वाढणार नाही.
- जिओवर टीव्ही, सिनेमा आणि मासिकं पाहण्याची सोय
- 300 चॅनल लाइव्ह पाहण्याची सुविधा
- 15 हजार रुपयांचं अॅप सब्स्क्रिप्शन अॅक्टिव्ह यूझर्ससाठी फ्री
- 3 हजार रुपयात जिओ 4G मोबाइल फोन
- आंतरराष्ट्रीय रोमिंग रेट सर्वात स्वस्त
संबंधित बातम्याः
रिलायन्स जिओचा धमाका, लाईफ-टाईम फ्री कॉलिंग, 50 रुपयात 1GB 4G डेटा
रिलायन्स जिओचा धुमाकूळ, कार्ड घेण्यासाठी रात्री 2 वाजल्यापासून रांगा
रिलायन्स जिओ सिम खरेदी करा आणि 3 महिन्यांपर्यंत फ्री इंटरनेट, कॉल, मेसेज मिळवा
Reliance Jio: अवघ्या 93 रुपयात मिळणार 10 जीबी 4G डेटा!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
Advertisement