एक्स्प्लोर
इंटरनेट यूजर्ससाठी एअरटेलचे दोन खास प्लॅन
देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी एअरटेलनं आपल्या प्रीपेड यूजर्ससाठी दोन नवे प्लॅन आणले आहेत.
मुंबई : देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी एअरटेलनं आपल्या प्रीपेड यूजर्ससाठी दोन नवे प्लॅन आणले आहेत. VoLTE सेवा सुरु केल्यानंतर एअरटेलनं जिओसह सर्वच टेलिकॉम कंपन्यांना चांगली टक्कर दिली आहे.
एअरटेलनं 49 रुपये आणि 157 रुपयांचे दोन नवे प्लॅन लाँच केले आहेत. हे दोन्ही प्लॅन डेटा यूजर्ससाठी आहेत. 157 रुपयांच्या प्लॅनमध्ये 3 जीबी 3जी आणि 4जी डेटा मिळणार आहे. ज्याची वैधता 27 दिवसांसाठी असणार आहे. या प्लॅनमध्ये व्हॉईस कॉलिंग असणार नाही. तर 49 रुपयांच्या प्लॅनमध्ये 1 जीबी 3जी आणि 4जी डेटा मिळणार आहे. जो फक्त 1 दिवसाठी वैध असणार आहे.
एअरटेलच्या 'माय एअरटेल' अॅपमध्ये ‘Best offers for you’मध्ये या दोन्ही प्लॅनची माहिती देण्यात आली आहे.
नुकतंच एअरटेलनं 198 रुपयांचा डेटा प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्ये दररोज 1 जीबी डेटा मिळणार असून हा प्लॅन 28 दिवसांसाठी वैध असणार आहे.
(नोट : या प्लॅननुसार रिचार्ज करण्यापूर्वी हा प्लॅन तुमच्या नंबरसाठी वैध आहे किंवा नाही याची खात्री संबंधित कंपनीच्या वेबसाईट किंवा अॅपवरुन करा.)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement