एक्स्प्लोर
लाईक्स आणि फॉलोअर्सची चटक, व्हिडीओ 'प्रँक'च्या नादात बॉयफ्रेंड ठार!
मिनेसोटा (अमेरिका) : सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहणं म्हणजे त्याच्या आहारी जाणं असा होतं नाही. पण आजकाल तरुणाई सोशल मीडियाच्या प्रचंड आहारी जात असल्याचं वारंवार दिसून येत आहे. अनेकांना लाईक्स आणि फॉलोअर्सची अक्षरश: चटक लागलेली आहे. त्यासाठी वाट्टेल ते करण्याची त्याची तयारीही असते. असाच काहीसा प्रकार नुकताच समोर आला आहे. लाईक्स मिळवण्यासाठी एका प्रेमी युगुलानं असं काही केलं की ज्यामुळे प्रियकराला चक्क आपला जीव गमवावा लागला आहे.
अमेरिकेतील एका तरुणीनं सोशल मीडियासाठी स्टंट (प्रँक) करताना चक्क आपल्या प्रियकराचाच जीव घेतला.
मिनेसोटा येथे राहणाऱ्या 19 वर्षीय मोनालीसा पेरेजनं आपला 22 वर्षीय बॉयफ्रेंड पेड्रो रुइजवर गोळ्या झाडून हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. सध्या तिची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
ज्यावेळी मोनालिसानं रुइजवर गोळी झाडली त्यावेळी त्यांच्या आजूबाजूला 30हून अधिक लोकं आणि त्यांची 3 वर्षाची मुलगीही हे दृश्य पाहत होते.
मोनालिसा आणि रुइज यांनी एक व्हिडिओ चॅनल सुरु केलं होतं. यासाठी ते वेगवेगळे प्रँक करत होते. पण यावेळेस केलेलं प्रँक अखेर रुइजच्याच जीवावर बेतलं.
व्हिडिओ प्रँकसाठी रुइजनं आपल्या छातीवर एक जाडजूड पुस्तक ठेवलं आणि मोनालिसाला गोळी झाडण्यास सांगितलं. गोळी पुस्तकात घुसेल आणि आपल्याला काहीही होणार नाही असा त्याचा कयास होता. पण झालं मात्र भलतंच. मोनालिसानं झाडलेली गोळी थेट रुइजच्या छातीतच घुसली आणि तो गतप्राण झाला.
दरम्यान या प्रँक शूटआधी मोनालिसानं ट्विटरवरुन याची माहितीही दिली होती. 'मी आणि पेड्रो आतापर्यंतचं सर्वात डेंजरस व्हिडिओ शूट करणार आहोत. ही त्याची कल्पना आहे, माझी नाही.'
रुइजच्या एका नातेवाईकाच्या मते, 'रुइज सोशल मीडियावर आपले फॉलोवर्स वाढविण्यासाठी हा खटाटोप करत होता. कारण की, त्याला यामुळे चर्चेत राहायचं होतं. जेणेकरुन त्याच्या व्हिडीओचे व्ह्यू वाढले असते.' फोटो सौजन्य: सोशल मीडिया 'त्यानं मला याबाबत सांगितलं होतं. पण तुम्ही असं करु नका असंही त्यांना मी बजावलं होतं. पण त्यांनी माझं ऐकलं नाही.' असंही रुइजच्या एका महिला नातेवाईकानं सांगितलं. पोलिसांच्या मते, रुइजच्या छातीवर एक हार्डकव्हर असलेलं पुस्तक होतं आणि गोळी चालवण्यासाठी 50 कॅलिबर हँडगन वापरण्यात आलं होतं. मोनालिसानं जवळजवळ 1 फूट अतंरावरुन रुइजवर गोळी झाडली होती. ज्यात त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, मोनालिसा सध्या गर्भवती असल्याचीही माहिती समजते आहे. आज तिला कोर्टात हजर केलं जाणार आहे.Me and Pedro are probably going to shoot one of the most dangerous videos ever???????? HIS idea not MINE????
— Monalisa Perez (@MonalisaPerez5) June 26, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement