एक्स्प्लोर
जिओची दिवाळी ऑफर, 399 रु. रिचार्जवर 100 टक्के कॅशबॅक
जिओनं नुकतीच 'दिवाळी धन धना धन' ही ऑफर लाँच केली आहे. यामध्ये 399 रुपयांच्या रिचार्जवर 100 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. म्हणजेच यूजर्सला हा प्लॅन मोफत मिळणार आहे.
मुंबई : दिवाळीच्या आधी प्रत्येक दूरसंचार कंपनीनं आपल्या ग्राहकांसाठी अनेक ऑफर लाँच केल्या आहेत. अशीच एक भन्नाट ऑफर जिओनं देखील आपल्या प्रीपेड यूजर्ससाठीही आणली आहे.
जिओनं नुकतीच 'दिवाळी धन धना धन' ही ऑफर लाँच केली आहे. यामध्ये 399 रुपयांच्या रिचार्जवर 100 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. म्हणजेच यूजर्सला हा प्लॅन मोफत मिळणार आहे.
399 रुपयांच्या या रिचार्जमध्ये तीन महिन्यापर्यंत मोफत व्हॉईस कॉलिंग, फ्री SMS आणि सर्व STD कॉलही मोफत मिळणार आहेत. यासोबतच दररोज 1 जीबी डेटाही मिळणार आहे.
पण ही ऑफर मिळवण्यासाठी ग्राहकांकडे फारच कमी वेळ आहे. कारण जिओ दिवाळी धन धना धन ऑफर 12 ते 18 ऑक्टोबरमध्येच घेता येणार आहे. ही ऑफर मिळवण्यासाठी प्रीपेड ग्राहकांना येत्या 7 दिवसात रिचार्ज करावं लागेल.
अशी मिळवा कॅशबॅक ऑफर! जिओनं आपल्या ग्राहकांना 100 टक्के कॅशबॅक देणार असल्याचं म्हटलं आहे. जिओच्या मते, 399 रुपयांच्या रिचार्जवर ग्राहकांना 50 रुपयांचे 8 वॉउचर मिळतील. म्हणजेच 399 रुपयावर 400 रुपये कॅशबॅक हे वॉउचर 309 रुपयांपेक्षा अधिकच्या रिचार्जवर किंवा 99 रुपयांहून अधिकच्या डेटा रिचार्जवर वापरता येतील. यूजर्सला हे वॉउचर 15 नोव्हेंबरनंतर वापरता येणार आहेत. जिओची वेबसाइट, रिलायन्स डिजिटल आणि जिओ स्टोअरच्या माध्यमातून रिचार्ज करता येणार आहे. (नोट : या प्लॅननुसार रिचार्ज करण्यापूर्वी हा प्लॅन तुमच्या नंबरसाठी वैध आहे किंवा नाही याची खात्री संबंधित कंपनीच्या वेबसाईट किंवा अॅपवरुन करा.)A festive surprise for our Jio family - Recharge for Rs. 399/- and get 100% cashback! Here's wishing you a #JioHappyDiwali #WithLoveFromJio pic.twitter.com/Kbcrm5QV44
— Reliance Jio (@reliancejio) October 11, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement