Iphone 15 Offers On Jio Mart : 50 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा iphone 15, मुकेश अंबानींची मोठी ऑफर, संपूर्ण डिटेल्स एका क्लिकवर...
आयफोन 15 वर जिओमार्टवर चांगले ऑफर्स मिळत आहे. यात आयफोन 15 आता 50 हजारात खरेदी करु शकणार आहोत. अॅपल आयफोन 15 सप्टेंबर 2023 मध्ये लाँच करण्यात आला होता.
Iphone 15 Offers On Jio Mart : आयफोन 15 सीरिज ही अॅपलची लेटेस्ट लाँच (apple) सीरिज आहे. यात उत्तम कॅमेरा, डिस्प्ले, प्रोसेसर आणि बॅटरीसह टाइप सी चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. मात्र या आयफोनची किंमतही तेवढीच महाग आहे. ज्यामुळे बहुतेक लोक आयफोन 15 (Iphone 15) सीरिजचे स्मार्टफोन खरेदी करू शकत नाहीत. मात्र आता या आयफोन 15 वर ऑफर्स मिळत आहे. अॅपल आयफोन 15 सप्टेंबर 2023 मध्ये लाँच करण्यात आला होता.
किंमत आणि ऑफर्स
आयफोन 15 ला 79,990 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते, पण आयफोन 15 मुकेश अंबानी लीड कॉमर्स प्लॅटफॉर्म जिओमार्टवर 70,900 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. जास्तीत जास्त एक्सचेंज ऑफर आणि बँक डिस्काउंट चा समावेश केल्यास फोनची किंमत 46,900 रुपयांपर्यंत खाली येते.
बँक डिस्काउंट ऑफर्स
जिओमार्ट जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात आयफोन 15 च्या खरेदीवर जास्तीत जास्त 20,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर देत आहे. अशापरिस्थितीत फोनची किंमत 50,900 रुपये आहे. याशिवाय 4000 रुपयांचा एक्सचेंज ऑफर दिला जात आहे. एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डवर ही ऑफर दिली जात आहे. त्यामुळे फोनची किंमत 46,900 रुपयांपर्यंत खाली येते.
कॅमेरा आणि डिस्प्लेबाबत माहिती
आयफोन 15 सीरिजमध्ये 48 मेगापिक्सेल मेन कॅमेरा, 24 मेगा पिक्सेल सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. तर, 12 मेगापिक्सेल फ्रंटकॅमेरा देण्यात आला आहे. आयफोन 15 मध्ये 6.1 इंच स्क्रिन देण्यात आली आहे. त्याशिवास आयफोन 15 प्लसमध्ये 6.7 इंचाची डिस्पे देण्यात आला आहे. आयफोन 15 सीरिजमध्ये A16 बायोनिक चिप फिचर्स फार महत्त्वाचं आहे. यामध्ये नवीन कॅमेरा सिस्टीम देण्यात आलेली आहे. यातील नाईट मोडमध्ये नवीन अपडेट देण्यात आलं आहे. व्हिडीओच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, नवीन आयफोन 15 प्रो मध्ये यूजर्स 4K 60FPS एवढ्या हाय क्वालिटीचे व्हिडिओ रेकॉर्ड करू शकणार आहेत.
भारतात Apple 15 सीरीज ओरिजीनल किंमत
iPhone 15 (128 GB): 79,900 रुपये
iPhone 15 (256 GB): 89,900 रुपये
iPhone 15 (512GB): 1,09,900 रुपये
सध्या आयफोनच्या सगळ्याच मॉडेल्सवर अनेक ऑफर्स सुरु आहेत. apple वेबसाईटवर तर फ्लिपकार्ट आणि अॅमॅझॉनवरदेखील विविध क्रेडीट आणि डेबिट कार्डवर वेगवेगळे ऑफर्स मिळत आहे. HDFC च्या क्रेडीट कार्डवर साधारण 2000 रुपयांची सूट देण्यात येत आहे. त्यासोबतच अनेक बॅकेत किंवा बजाज फायनांन्सवर EMI वरदेखील तुम्ही आयफोन खरेदी करु शकता.
इतर महत्वाची बातमी-