Health Tips : शुगर क्रेविंग कमी करायचेय? 'या' पाच फळांचा करा रोजच्या आहारात समावेश
साखरेचा वापर रोजच्या आहारात कमी करायचा असेल तर अनेक प्रकारची फळे खावीत. शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी फळ हा उत्तम पर्याय असू शकतो. नेमकी कोणती फळे खावीत किती प्रमाणात खावीत जाणून घेऊ.
Health Tips : कधीतरी अचानक आपल्याला खूप गोड खावेसे वाटते आणि आपण आर्टिफिशिअल शुगर (ARTIFICIAL SUGAR) खातो. याचा शरीरावर वाईट परिणाम होतो. आईस्क्रीम, पेस्ट्री, आणि गोड पदार्थ अति प्रमाणात खाल्याने अनेक शारीरिक नुकसानांना सामोरे जावे लागते. ज्यामुळे मधुमेह (DIABETIES), हृदयविकार (HEART DISEASE) असे आजार होऊ शकतात. यामुळे कृत्रिम साखरे ऐवजी नैसर्गिक पदार्थांचा समावेश आहारात करावा. ज्याचा शरीराला सर्वात जास्त फायदा होऊ शकतो. फळ खाल्याने जास्तीत जास्त नैसर्गिक साखर आपल्या शरीरात जाते. परिणामी अनेक आजारांपासून आपले शरीर दूर राहते.
आंबा (MANGO)
आंब्यात साखरेचे प्रमाण असते. सोबतच फायबर (FIBRE) आणि व्हिटामिन सी (VITAMIN C) सोबतच यात व्हिटामिन ई (VITAMIN E), व्हिटामिन ए (VITAMIN A), व्हिटामिन के (VITAMIN K) असते. यामुळे नैसर्गिक पद्धतीने साखर शरीरात जाऊ शकते.
पिअर (PEAR)
यात साखरेचे प्रमाण अतिशय योग्य असते. हे फळ चवीला चांगले असून शरीरासाठी देखील आरोग्यदायक असते. यात फायबर (FIBRE) असल्याने तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रोल (cholesterol) नियंत्रित राहते. याचा समावेश रोजच्या आहारात केल्याने वजनही कमी होऊ शकते.
कलिंगड (WATERMELON)
उन्हाळ्याच्या दिवसात शुगर क्रेविंग कमी करायचं असल्यास टरबूज हा एक उत्तम पर्याय आहे. तसेच पाण्याचे प्रमाण यात जास्त असल्या कारणाने शरीरासाठी ते उपयुक्त आहे.
खरबूज (MUSKMELON)
चवीला गोड आणि कॅलरीला (CALORIES) कमी असणारे हे फळ शरीरातील तापमान कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. शुगर क्रेविंग कमी करण्यासाठी याचा आहारात वापर केला जाऊ शकतो. हे फळ तुम्ही रोजही खावू शकता.
बेरी (BERRIES)
ब्लू बेरी (BLUEBERTRIES), स्ट्रॉबेरी (STRAWBERRIES) , ब्लॅकबेरी (BLACKBERRIES) आणि रसबेरी या फळांचा वापर तुम्ही शुगर क्रेविंग कमी करण्याकरिता खाऊ शकता. या सर्व बेरीजचे सॅलेड (SALAD) बनवूनही तुम्ही खाऊ शकता.
केळी (BANANA)
शुगर क्रेविंग कमी करायची असल्यास केळी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यात मॅग्निशियम (MAGNESSIUM) आणि पोटॅशियमचे (POTASSIUM) प्रमाण अधिक असते. तसेच केळीमध्ये नैसर्गिक साखर असते. याचे सॅलेड तुम्ही दिवसाच्या कोणत्याही वेळी खाऊ शकता.
इतर महत्वाच्या बातम्या
SSC Result 2023 : यंदाही पोरीच अव्वल, तर कोकण विभाग नंबर वन; पाहा विभागनिहाय टक्केवारी
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )